Jalgaon

निवडणूक खर्च निरिक्षकांनी घेतला निवडणूकीचा आढावा उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश*

निवडणूक खर्च निरिक्षकांनी घेतला निवडणूकीचा आढावा                                                                              उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश*
                                       

निवडणूक खर्च निरिक्षकांनी घेतला निवडणूकीचा आढावा उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश*

                                                                                                                           जळगाव, दि. 27 – प्रतिनिधी सुरेश कोळी

 येत्या विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या सभा, बैठका, रॅलीसोबतच इतर प्रत्येक खर्चावर सर्व संबंधित यंत्रणांनी बारकाईन लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब खर्च अहवालात समाविष्ठ होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षकांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक आज जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आज विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्वपूर्ण सुचना केल्यात. यानंतर सर्व निवडणूक खर्च निरिक्षक त्यांना नेमूण दिलेल्या विधानसभा क्षेत्रात भेटीसाठी रवाना झाले. 
याप्रसंगी चोपडा, रावेर व भुसावळचे निवडणूक खर्च निरिक्षक श्री. हरीसन ॲन्टोनी, अमळनेर व एरंडोलचे श्री. बिस्वनाथ दास, चाळीसगाव व पाचोराचे श्री.अनंथ आर, जामनेर व मुक्ताईनगरचे खर्च निरिक्षक श्री.देवाशीष पॉल, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सी. पंडित, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणदिवे यांचेसह निवडणूक खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी विलास पाटील, तुषार चिनावलकर, श्री.आर.एस. परदेशी, श्री. एस. एस. भंगाळे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
 याप्रसंगी निवडणूक खर्च निरिक्षक यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करावी. विना परवानगी कुठलीही सभा, बैठका  होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी.तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात. 
जिल्ह्यातील अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव या विधानसभा मतदार संघाबरोबरच इतर मतदार संघातील खर्चावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी केल्यात. तत्पूर्वी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी निवडणूक खर्च निरिक्षकांना जिल्ह्यातील कृषि, उद्योग, पर्यटन, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय घडामोडींच्या संक्षिप्त माहितीसोबतच जिल्हा प्रशासनाने निवडणूकसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button