रावेर प्रतिनिधी ईश्वर शर्मा
जळगाव येथे जळगाव जिल्हा क्रीडा १४ वयोगटातील खोखो संघाची निवड झाली. त्यामध्ये अदित्य इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यात वेदिका मनोज महाजन(इ.५वी), ईशा गणेश पाटील(इ.७वी), नेत्रा विजय पाटील(इ.७वी), सलोनी निलेश महाजन(इ.७वी) या चार जणींची निवड झाली असून अंजुम जमीर तडवी(इ.६वी), सलोनी गणेश पटवारी(इ.६वी) व आरती बाबुलाल सैनी(इ.७वी) या तिघांची निवड राखीव जागेसाठी झाली. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रीडा शिक्षक श्री. मंगेश महाजन सर यांच्या मार्गर्शनाखाली व नेतृत्वाखाली मुलींनी यश मिळवले.
तसेच मुलींचा संघ हा राज्य स्तरीय खोखो स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन







