Pandharpur

“विरोधी उमेदवारांना प्रचारात शैलाताई गोडसे नी मागे टाकले”

“विरोधी उमेदवारांना प्रचारात शैलाताई गोडसे नी मागे टाकले”


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उद्या दि.३एफ्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. किती उमेदवार अर्ज मागे घेतात आणि किती उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहतात हे पहावयास मिळणार आहे.
भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, आणि अन्य पक्षीय उमेदवारांना उमेदवारी उशीरा मिळाल्यामुळे त्यांनी प्रचार आता सुरुवात केली आहे. परंतु शैलाताई गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर पासून आपला प्रचार सुरू केला आहे. ग्रामीण भागात घरोघरी तसेच वाडया वस्तीवर जाऊन आपण या मतदारसंघात उमेदवार म्हणून जनतेच्या पाठिंबा वर उभे राहिलो आहोत. संपूर्ण मतदारसंघाचा सर्वागिण विकास करण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवू.दोन्ही तालुक्यातील रखडलेले पाणीप्रश्न, एमआयडीसी बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकवेळ संधी दिली जावी असे आवाहन शैलाताई गोडसे नी केले.
पंढरपूर येथील उपनगरात घरोघरी जाऊन मतदार बंधूभगिनीची प्रत्येक्ष भेट घेऊन आपले मनोगत त्या व्यक्त करीत आहेत. पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग, नाथ चौक हरिदास वेस.मंदिर परिसरातील घरोघरी जाऊन शैलाताई गोडसे शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी एकवेळ संधी द्यावी. असे आवाहन त्या मतदारांना करीत आहेत.पंढरपूर शहरातून शैलाताई गोडसेना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर शहरातील प्रचार दौरा हा यशस्वी होत आहे. अन्य उमेदवार अद्यापही मतदारा पर्यंत पोहचले नाहीत. शैलाताई गोडसे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्यामुळे विरोधी पक्षाची धांदल उडाली आहे. असे चित्र सध्या मतदारसंघात दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button