Amalner

अमळनेरच्या महिला आठवडे बाजारात तिळगुळाचा गोडवा

अमळनेरच्या महिला आठवडे बाजारात तिळगुळाचा गोडवा

माजी आ.शिरीष चौधरी यांच्या कार्यालयात झाले स्नेहमीलन

अमळनेर-येथील झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून दर रविवारी माजी आ शिरीष चौधरींच्या कार्यालयाजवळ महिला आठवडे बाजार भरविला जात असताना गेल्या रविवारी दि 19 रोजी महिला भगिनींनीमध्ये आपसात तिळगुळाचा गोडवा निर्माण होण्यासाठी स्नेह मिलनाचा विशेष कार्यक्रम पार पडला.मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती यावेळी होती.
‘नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे’या संकल्पनेतून तिळगुळ घ्या गोड गोड बोला’अश्या शुभेच्छा महिला भगिनींनी यावेळी एकमेकींना दिला.संक्रांत हा सण स्नेह, आपुलकी व प्रेम शब्दात गुंफून ‘गोडवा’वाढवणारा असतो या सणाच्या निमित्ताने अनेक जण एकमेकांची भेट घेऊन, ख्याली खुशाली विचारतात.

खरे पाहता असे उत्सव नक्कीच परंपरेसोबत मनामनांचे धागे मजबूत करत असतात म्हणूनच झेप फौंडेशनने गेल्या रविवारी महिला आठवडा बाजाराच्या दिवशी सर्व स्टॉल धारक महिलां आणि ग्राहकांना संवादाच्या माध्यमातून एकत्रित आणून स्नेहमेळावा आयोजित केला,यावेळी उपस्थित महिलां भगिनींनी सदर सोहळ्याचा आनंद गोडव्याच्या माध्यमातून द्विगुणीत केला. “तीळ गुळ घ्या गोड गोड बोला ” रूपी भेटी गाठीने या मेळाव्याची सांगता झाली.
दरम्यान शिरीष चौधरी, अनिता चौधरी आणि सौ डॉ रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून अमळनेरात सुरू झालेल्या महिला आठवडे बाजारास दर रविवारी मोठा प्रतिसाद मिळत असून यामुळे स्टॉलधारक महिला देखील समाधानी आहेत.दिवसेंदिवस या बाजारास भेट देणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button