Rawer

जि.प.प्राथमिक शाळा कुसुंबे येथे”कलाविष्कार 2020″संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा कुसुंबे येथे”कलाविष्कार 2020″संपन्न

प्रतिनिधी विलास ताठे

जि.प.प्राथमिक शाळा कुसुंबे येथे “कलाविष्कार 2020″चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन पं.समिती सदस्या योगिता वानखेडे यांनी केले.यावेळी केंद्र प्रमुख खलिल तडवी,कुसुंबे बु.चे सरपंच सलिम तडवी,कुसुंबे खु.च्या सरपंच नुरजहान तडवी,शाळा व्य.समिती अध्यक्ष जगदिश महाजन,मा.विद्यालयाचे सचिव नारायण घोडके,ग्रामपंचायत सदस्य मुबारक तडवी,नेट सेट परिक्षेत यश मिळवणारे शाळेचे मा.विद्यार्थी विवेक महाजन मुख्याध्यापक दिलीप पाटील,ग.स.सोसायटीच्या मा.संचालिका कल्पना पाटील प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप पाटील यांनी केले.यावेळी इयत्ता 1 ते 4 च्या मुलामुलींनी कलाविष्कार या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत,राष्ट्रीय एकात्मता व अखंडता यावर आधारित गीते,दारूबंदीवर,हुंडा प्रथेवर व स्वच्छता मोहिमेविषयी प्रबोधनपर नाटीका,
सादरीकरण करण्यात आल्या.

पं.समिती सदस्या योगिता वानखेडे यांनी शाळेने केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक प्रगतीबद्दल मुख्याध्यापक,शिक्षक,व पालकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.शाळेचे माजी विद्यार्थी प्रा.विवेक महाजन हे नेट सेट परिक्षा पास झाल्याने त्यांचा सत्कार दिलीप पाटील यांनी केला कार्यक्रम अतिशय उल्हासित वातावरणात पार पडला.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक दिलीप पाटील,जगन्नाथ अजलसोंडे,जितेंद्र नारखेडे,विजय गोसावी, दिपक कोंडे,बजरंग भागवत,विठ्ठल भुतेकर,कल्पेश पाटील यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन विजय गोसावी व कल्पना पाटील यांनी केले.आभार जगन्नाथ अजलसोंडे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button