Maharashtra

सेनीटाईझर फवारनी मशीन बसवण्याची मागणी -शिवसेना समीर पठाण

सेनीटाईझर फवारनी मशीन बसवण्याची मागणी -शिवसेना समीर पठाण

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

शहरातील गर्दीच्या ठिकाणी प्रवेश द्वारावर सेनीटाईझर फवारनी मशीन बसवण्याची मागणी आज दि. १० एप्रील रोजी शिवसेना ,मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हाध्यक्ष समीर पठाण यांच्यातर्फे तहसील व न.प. मुख्याधीकारी यांच्याकडे करण्यात आली.

संपुर्ण जगासह देशात व राज्यात कोवीड १९ चा वाढता हाहाकार पाहून जागतीक आरोग्य संस्था ( WHO ) ने दिलेल्या निर्देशानुसार पुढील काळात वैश्वीक महामारीचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यास कुठलीच त्रुटी राहू नये या अनुशंगाने शहरामधील मंडई पेठ, न्यायालय परिसर, राष्ट्रीयकृत बँका, उप जिल्हा रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समीती आदी
गर्दीच्या ठिकाणी प्रवेशद्वारांवर कोरोना सारख्या भयानक विषाणु पासुन रक्षण होण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून सेनीटायझरींग फवारणीची मशीन बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button