चांदवडचे तहसीलदार यांना सर्वपक्षीय निवेदन
प्रतिनिधी उदय वायकोळे
चांदवड शहरात असलेल्या कोविड सेंटर मध्ये चांदवड तालुक्याबाहेरील पेशंट न ठेवणेबाबत निवेदन चांदवड तालुक्याचे तहसीलदार श्री प्रदीप पाटील यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिले. चांदवड शहर 2 महिने कंटेन्मेंट झोन होते,आता शहरातील परिस्थिती सुधारत आहे,अशातच जर बाहेरच्या तालुक्यातून पेशंट चांदवड येथे आणले तर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच इतर तालुक्यातील पेशंट चांदवड शहरात ठेवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
चांदवड नगरपरिषद नगरसेवकांनी सुद्धा अश्या आशयाचा एक ठराव केला आहे व त्यात म्हटले आहे की चांदवड तालुक्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाण मालेगाव,देवळा,लासलगाव,सटाणा येथील पेशंट चांदवड कोविड सेंटर मध्ये आणू नये






