sawada

सावदा ग्रामीण रुग्णालयात पूर्ण कर्मचाऱ्यांसह वाहन व्यवस्था उपलब्ध करावी मा. नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे नामदार टोपे यांना निवेदन

सावदा ग्रामीण रुग्णालयात पूर्ण कर्मचाऱ्यांसह वाहन व्यवस्था उपलब्ध करावी मा. नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे नामदार टोपे यांना निवेदन

युसूफ शाह

सावदा प्रतिनिधी जळगाव जिल्हा सुरुवातीला कोरोना सारख्या विषाणू पासून दोन हात लांब होता परंतु आज पाहता – पाहता जळगाव जिल्ह्यात आज ८०० कोरोणा रुग्ण झाले आहे . सुरुवातीच्या तीन लाँकडाऊन मध्ये आमच्या रावेर तालुक्यात एकही कोरणा रुग्ण नव्हता परंतु लॉकडाऊन ४ मध्ये रावेर तालुक्यातील सावदा शहरात एक रुग्ण आढळून आला आणि तालुक्यात पाहता पाहता कोरोणा रुग्णांच्या संख्यने चाळीशी गाठली आहे यात अगदी नियोजनबद्ध काम करत असताना प्रांत अधिकारी डॉ . अजित थोरबोले , तहसीलदार उषाराणी देवगुने , बीडीओ सोनिया नाकाडे,सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल वाघ , सावदा शहराचे मुख्याधिकारी सौरभ जोशी , सावदा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मराठे या सर्व टीमने आपला जीव ओतून कोरणा विषाणुच्या नियंत्रणासाठी आटोकाट प्रयत्न केला व करीत आहे . परंतु सावदा शहर देशातील केळीची मुख्य बाजार पेठ असल्यामुळे एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे सावदा शहराला कोरोना चे ग्रहण लागलेच . आज जळगाव जिल्ह्यातील कोविंड रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असुन मृत्यूदर हा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे त्यात सावदा शहराचा कोविंड रूग्णांचा मृत्यूदर जिल्ह्यात लक्षवेधक आहे जळगाव येथे सामान्य रुग्णालयांमध्ये गेलेला कोविंड चा रुग्ण धास्तावलेल्या स्थितीमध्ये असतो त्यांच्यावर उच्च प्रतीचा उपचार होत नाही त्या ठिकाणी रुग्णांची हेळसांड केली जाते तेथे ऑक्सिजनची असलेली कमतरता येथील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसून त्या समन्वयाअभावी वेळेवर रुग्ण दगावण्याची परिस्थिती निर्माण होते . सावदा शहराच जर सांगायचं झालं तर डॉक्टर्स व नर्सेस मेडिकल कर्मचारी यांची जेमतेम संख्या तज्ञ डॉक्टरांचा तुटवडा त्याच बरोबर प्रभावी औषधांचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे . आरोग्य व्यवस्था सक्षम नाही.त्यात कर्मचाऱ्यांची सःख्या खूप कमी आहे . नर्सिंग व लिपिक कर्मचारी नसल्याने डॉक्टर लोकांवर ताण पडतो.व वेळेवर लिपीक ची कामे देखील डॉक्टरर्स यांना करावी लागतात . , आरोग्य व्यवस्थे कड़े कागद , फाईल , थर्मल स्कॅनर , सारखी अत्यंत गरजेची गोष्टी पण नसल्याने त्यांना खूप अडचणी येतात . रुग्णाचे कोवीड अहवाल लवकर मिळत नाही त्यामुळे रुग्ण व लोक प्रशासन संभ्रमात राहतात . सावदा येथे ग्रामीण रुग्णालय असून दोन कोवीड सेंटर आहेत परंतु या ठिकाणी कोणतीही रुग्णवाहिका नाही पर्यायी वाहन व्यवस्था नाही पुरेसा कर्मचारी वर्ग नाही तरी येथील कोवीड योदध्यांनी लढावे तरी कसे हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे आपण सर्व ठिकाणी निश्चित समान न्याय देत आहात आपण एक कोवीड योध्दा म्हणून काम करीत आहात . आमच्या या काही लोकाभिमुख तुरळक मागण्या आहेत त्यावर आपण वरिष्ठ पातळीवरून संबंधितांना सूचना द्याव्या व मागण्या पूर्ण केल्या जाव्या , जेणेकरून येथील प्रशासनाला हे कोविंड युद्ध सोयीचे व सुलभ होईल .असे निवेदनात म्हटले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button