Pune

कुडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर, कर्मचाऱ्यांनी बाळंतीण महिलेसोबत हलगर्जीपणाबद्दल कारवाही करा – बिरसा क्रांती दल खेड ची मागणी

कुडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर, कर्मचाऱ्यांनी बाळंतीण महिलेसोबत हलगर्जीपणाबदडल कारवाही करा – बिरसा क्रांती दल खेड ची मागणी

खेड – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

कुडे बु! (ता. खेड)प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डाँक्टर व कर्मचारी वर कारवाही करण्याबाबत बिरसा क्रांती दल खेड वतीने निवेदन निवासी तहसिलदार कानसकर व गटविकास आधिकारी अजय जोशी यांना देण्यात आले.
सौ. मनीषा संदिप बुरुड ही महिला खेड तालुक्यातील खरपूड (म्हसेवाडी) येथील रहिवासी असून या आदिवासी माता आहे. त्यांच्या पतीने जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे बुद्रुक येथे फोन लावला व येथील कर्मचाऱ्यांना मनीषा बुरुड यांना बाळंतपणासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आँब्युलन्स गाडी पाठवा. अशी विनंती करण्यात आली. मात्र कुडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने रुग्णालयाची गाडी ना दुरुस्त असल्याचे सांगितले इतकेच नव्हे तर उडवा उडावीची उत्तरे देऊन फोन ठेवला. मुळात प्रशासनाची व इतर प्राथमिक माहिती नसल्याने १०८ या नंबरवर त्यांना संपर्क साधता आला नाही. अखेर हताश झालेल्या संदीप बुरुड यांना काय करावे ते समजेना झाले. मात्र मनीषा ताईचे नशीब थोर म्हणून त्या घरीच सुखरूप बाळंतीण झाल्या .
सकाळी पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे बुद्रुक येथून संदीप बुरुड यांना फोन आला . बाळंतीण महिलेला व बाळाला तपासणीसाठी काहीही करून दवाखान्यात घेऊन या असे सांगण्यात आले.मुसळधार पाऊस सुरू असल्याने आरोग्य केंद्राची गाडी आता तरी पाठवा अशी विनंती केली असता आता तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही करून या ! रुग्णालयाची आँब्युलन्स ना दुरुस्त आहे. मात्र पुन्हा घरी जाण्यासाठी अंबुलन्स उपलब्ध करून देतो असे सांगण्यात आले. दुसरी वाहने उपलब्ध नसल्याने बाळ व बाळंतीण खरपूड (म्हसेवाडी) येथून प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे बुद्रुक येथे छोटा हत्ती या वाहनात बसून थेट पोहचले.
तपासणी झाल्यानंतर काही कार्यकर्ते यांनी येथील रुग्णालयातील कामकाज बाबत ताशेरे ओढल्यावर येथील कर्मचारी सहकार्य करू लागले व तुम्हाला घरी जाण्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो असे सांगितले . मात्र कार्यकर्ते घरी गेले असता आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा सांगितले आँब्युलन्स उपलब्ध होत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊ शकता. काही वेळ वादविवाद झाल्यानंतर खरपूड येथे जाणाऱ्या दूध गाडीला रुग्णालयात आणली. बाळ व बाळंतीण मनीषा ताई बुरुड रिमझिम पावसात त्या दूध गाडीत बसल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे बुद्रुक येथून खरपूड (म्हसेवाडी) येथे १३ किलोमीटर या एका दिवसाच्या आदिवासी बाळंतीण मातेला व बाळाला दूध गाडीतून प्रवास केला करावा लावला.
प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे बुद्रुक यांच्या कामकाज बाबत येथील स्थानिक ग्रामस्थ नाराज आहेत. गेली कित्येक दिवसांपासून आँब्युलन्स ना दुरुस्त असल्याचे कारण सांगून आदिवासी भागातील रुग्णांच्या जीविताशी खेळले जात आहे. मात्र येथील प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही.आदिवासी महिलांचा जीव गेल्यावर रुग्णालय प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणाची आरोग्य विभागाने चौकशी करून दोषी डाँक्टर व कर्मचारीवर कारवाई करावी. कुडे बु प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार कर्मचाऱ्यांवर शासनाच्या सेवा शर्तीनुसार त्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी व बाळतीन महिलेस कुडे बु येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यासाठी व परत तेथून तिच्या घरी जाण्यासाठी आलेला खर्च रक्कम रुपये सातशे रुपये बाळतणीस महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे बु यांच्या कडून मिळावे व संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी बिरसा क्रांती दल खेडच्या वतीने उपस्थित कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, सहसचिव तथा भोमाळे गावचे सरपंच सुधीर भोमाळे, उपाध्यक्ष संतोष भांगे, मारुती भागीत, यशवंत शिंगाडे, रामदास निर्मळ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button