Amalner

Amalner: बस आगारात आगार प्रमुखाच्या मनमानी कारभारच्या विरोधात एल्गार..!

Amalner: बस आगारात आगार प्रमुखाच्या मनमानी कारभारच्या विरोधात एल्गार..!

अमळनेर येथील बस स्थानकातील कर्मचार्यांनी आगार प्रमुखाच्या मनमानी कारभार व उद्धट वागणुकीच्या विरोधात केले तीव्र आंदोलन.
बस स्थानक आगार प्रमुख इम्रान पठाण हे मनमानी व उध्दट कारभार करतात, रजेचा पगार सह पगाराच्या मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करण्याच्या विरोधात काम बंद चे आंदोलन करीत जाब विचारण्यासाठी आगार प्रमुखाच्या कार्यालयात गेले. अश्या उद्धट अधिकाऱ्यावर सरकारने कडक कारवाई करावी व
कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य केलेल्या कारवाई मागे घ्यावे, अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे.

ड्युटी नसतांना विनाकारण बसवून ठेवणे, कायद्या नसतांना रजेचा पगार व्यतिरीक्त मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करणे, हक्काच्या रजां नदेने, कर्मचाऱ्याच्या नात्यात मृत्यू झाल्यास रजा न देता कामावर येण्यास आदेश देणे, पगार कपात का केला म्हणून विचारले म्हणून कामावरून काही कालवधी साठी कमी करने, कर्तव्यावर असताना कागदी रोल योग्य प्रमाणात नदेतां स्वतःचे पैसे खर्च
करण्यास भाग पाडणे, चालक वाहक यांच्या विश्राम गृह सह शौचालयाची दुरावस्था असून जाणूनबुजन दुर्लक्ष करने, कर्मचारी मध्ये भेदाभेद निर्माण करणे, यासह अनेक समस्यांसाठी आंदोलन केले.

दरम्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन उग्र होण्याच्या आत अमळनेरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय
शिंदे,पीएसआय नरसिंह वाघ, पीएसआय अक्षदा इंगळे, पोना सिद्धांत शिसोदे,पोना रवींद्र पाटील,पोना दिपक माळी,पोना बापू साळुंखे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कर्मचारी व आगार प्रमुख यांच्यात संवाद साधून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यास सांगितल्याने बस सेवा पूर्वरत सुरू करण्यात यश मिळवले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button