Maharashtra

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ….

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ….

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ....

नगरपरिषद आणि तहसील प्रशासनाच्या वरदहस्ता मुळे बोरी माईचे होते आहे अवैध वस्त्रहरण….

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ....

अमळनेर  

बोरी नदी अमलनेरकरांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा वारसा आहे.शेकडो वर्षांपासून अमळनेर नागरिकांच्या भावना बोरी नदीशी जुळलेल्या आहेत.सांस्कृतिक धरोहर असलेल्या बोरी नदीचे मात्र सर्रास वस्त्रहरण होत आहे.

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ....

खारटेश्वर मंदिरांच्या मागील नदी परिसरात सातत्याने नदीचे उत्तखनन होत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असल्याचे पुरावे सापडले.पावसाळा सुरु झाला आहे आणि अवैध वाळू उपसा वर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाहीयाची प्रचिती आली.तहसील प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने डोळे मिटून अवैध वाळू उपसा कडे दुर्लक्ष करत वाळू माफिया यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे एका टप्प्यातील वाळू उत्तखनन निर्दशनास आले त्यापुढे नदी पात्रात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा केले जाते आहे.

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ....

प्रशासनाने धृतराष्ट्रांची भूमिका घेतली असून डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि बोरी नदीचे वस्त्रहरण वेड्याचे सोंग घेऊन पाहत आहे.यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी आणि बोरी नदी चे वस्त्रहरण थांबवावे.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाने घेतली धृतराष्ट्राची भूमिका बोरी माईचे वस्त्रहरण ....

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button