शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्र भेट
जितेंद्र गायकवाड
खानापूर
कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत रावेर तालुक्यातील खानापूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2019-20 अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पिकावरील समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात आला आलेला . या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा उद्देश साध्य करण्यावर भर देण्यात आला आज .एकूण २५ एकर क्षेत्रावर हरभरा पिकाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली होती .
त्यानिमित्त शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्र दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रकल्प अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची राज विजय या जातीचे बियाणे,बीजप्रक्रिया करिता जिवाणू खते, कीडनियंत्रणासाठी कीडनाशके तसेच पिवळे चिकट सापळे निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आलेल्या आहेत या क्षेत्र भेटीत श्री.महेश वि महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण) यांनी हरभरा पिकाच्या कीड रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच हरभरा पिकात मर रोग च्या नियंत्रण साठी जैविक बुरशी व बविस्टीन या रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करण्याचे सांगितले. या भेट प्रसंगी खानापूर येथिल लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.






