सूर्य पाहिलेला माणूस सूर्याला चकवून गेला..डॉ श्रीराम लागू यांचे निधन…समाजवादी विचार प्रणालीत निर्माण झाली पोकळी
विनम्र अभिवादन
संकलन प्रा जयश्री साळुंके
डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.
१९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता.
भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे पुरस्कर्ते होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर ‘देवाला रिटायर करा’ नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.
ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.ते विज्ञानवादी आणि समाजवादी विचार प्रणालीचे होते. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटत असे . आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरूण पिढीला डॉ. लागू नेहमी सांगत असत.
आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटते. आता तर बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत असत.
त्यांनी झाकोळ (पटकथा) लिहली तर
डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
“लमाण” हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.






