Amalner

Amalner: खान्देश शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

Amalner: खान्देश शिक्षण मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

अमळनेर: नगरातील खान्देश शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या सर्वच शाळा व कॉलेज यांनी शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ज्ञान व सर्वोत्कृष्ट निकाल देवून आपली एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. खा. शि. मंडळाचा विद्यार्थी म्हणून निश्चित येथील विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रात सन्मानपूर्वक नजरेने पाहीले जाते. याच परंपरेतील खा. शि. मंडळ संचालित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, या महाविद्यालयातील डिप्लोमा फार्मसी विभागाने या वर्षी उत्कृष्ट निकाल नोंदविला.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा, मुंबई यांनी घेतलेल्या डी. फार्मसीच्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये अंतिम वर्षाचा ७९% निकाल लागला असून राजनंदिनी महाजन ८६.०९% मार्क्स घेवून प्रथम, सेजल शाह ८२.८२% घेवून द्वितीय व रोहन सपकाळे हा ८२ % मार्क्स घेवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच प्रथम वर्ष डी. फार्मसी चा निकाल ९१ % लागला असून कल्याणी महाजन ७९% मार्क्स घेवून प्रथम, मानसी पाटील ७८.९० % घेवून द्वितीय व खाटिक बुशरा ही ७८.३०% मार्क्स घेवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
डिप्लोमा फार्मसी विभागाचे प्रमुख प्रा. रविंद्र माळी, प्रा. छाया महाजन, प्रा. प्रियांका महाजन, प्रा. हर्षदा पवार, प्रा. मानसी उपासनी, प्रा. वैशाली पाटील, तसेच प्रा. अनिल बोरसे, प्रा. देवेश भावसार व प्रा. स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हे यश मिळवून दिले.
डिप्लोमा फार्मसी विभागाच्या या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,
उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे व माधुरी पाटील, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप जी अग्रवाल, फार्मसीचे चेअरमन योगेश मुंदडे, खा. शि मंडळ सदस्य हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, सी ए नीरज अग्रवाल, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चिटणीस डॉ. ए. बी जैन यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद सोनवणे, विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button