Aurangabad

गावठी पिस्टल (कट्टा) घेऊन फिरणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड…

गावठी पिस्टल (कट्टा) घेऊन फिरणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : इसम नामे अविनाश दत्तू मिसाळ रा. शिवाजीनगर पाचोड हा काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीर रीत्या गावठी पिस्टल ताब्यात बाळगून झाल्टा फाटा ता. जि. औरंगाबाद येथे थांबलेला आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर ठिकाणी जाऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार झाल्टा फाटा येथील हॉटेल यशवंत समोर उभा असलेल्या इसमावर अचानक पणे दिनांक ७/६/२०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास ५:४५ वाजता पंचासमक्ष छापा टाकून पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अविनाश दत्तू मिसाळ, वय ३३ वर्ष, रा. शिवाजीनगर पाचोड, ता. पैठण जिल्हा औरंगाबाद असे सांगितले.

पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या कमरेच्या डाव्या बाजूला एक पिस्टल/अग्नीशस्त्र (गावठी कट्टा) व मॅग्जिनमध्ये १ जिवंत काडतुस आढळून आले. तसेच त्यांच्याकडे बाळगण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीच्या ताब्यातून ५०,५०० रुपये किमतीचे एक सिल्वर रंगाचे पिस्टल / अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल सविस्तर जप्ती पंचनामा करून जप्त करण्यात आला. आरोपीस सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी पोलीस ठाणे चिकलठाणा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, संदीप सोळंके, पोह. श्रीमंत भालेराव, प्रमोद खांडेभराड, सिरसाठ, पोना. नरेंद्र खंदारे, संजय भोसले, पोकाॅ. योगेश तरमाळे, जिवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button