Bollywood

Bollywood: ब्रम्हास्त्र चा ट्रेलर रिलीज..! हाती शस्त्र,दमदार अभिनय..आणि अमिताभ बच्चन..!पहा व्हिडीओ..!

Bollywood: ब्रम्हास्त्र चा ट्रेलर रिलीज..! हाती शस्त्र,दमदार अभिनय..आणि अमिताभ बच्चन..!पहा व्हिडीओ..!
सध्या बॉलिवूडमध्ये ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे चित्रपट लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’, हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. त्याचपूर्वी चित्रपट प्रदर्शित होण्यास नऊ दिवस बाकी म्हणत करण जोहरने या चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.या टीझरला काही तासांमध्येच अधिक व्ह्युज मिळाले आहेत. चित्रपटाच्या या नव्या टीझरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा नवा लूक पाहायला मिळत आहे.
या टीझरमध्ये अमिताभ संपूर्ण ताकदीसह समोर उभ्या असलेल्या शत्रुचा विनाश करताना दिसत आहेत. अमिताभ यांच्या हातात शस्त्र, चेहऱ्यावरील हावभाव आणि दमदार अभिनय विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. वयाच्या ७९व्या वर्षी देखील अमिताभ यांचं काम पाहून नेटकरी त्यांचं तोंडभरून कौतुक करत आहेत. या चित्रपटात ते अभिनेता रणबीर कपूरच्या गुरुची भूमिका साकारणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हॉलिवूड चित्रपटासारखी कलाकृती पाहायला मिळेल, आम्ही चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहोत अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स यांचं मिश्रण असलेल्या चित्रपटात सर्व अस्त्रांचं शक्तीस्थान असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांचा देखील दमदार अंदाज पाहायला मिळेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button