AmalnerMaharashtra

??’ठोस प्रहार’ चा दणका जुगाऱ्यांचा  खेळ मोडला….वाचनालयाने घेतला मोकळा श्वास…

??’ठोस प्रहार’ चा दणका
जुगाऱ्यांचा खेळ मोडला….वाचनालयाने घेतला मोकळा श्वास…

रजनीकांत पाटील

अमळनेर ता : कवपिंप्री येथील चक्क वाचनालयाला जुगाराचा दर्जा प्राप्त झाला होता. या बाबत चर्चा मात्र पूर्ण गावभर नव्हे तर तालुक्याभर झाली होती. की काही गावातीक लोक वाचनालायावर जुगार खेळतांना दिसतात.
या बाबत कोणी काही ही बोलत नसत. असे कवपिंप्री गावतील तरुणांनी ‘ठोस प्रहार’ शी बोलतांना सांगीतले की जो यांना बोलतो त्याचाच चेहरा समोर येतो. असे म्हणत काही तरुण घाबरत असत.

तरी देखील गावातील काही तरुणांना विचारपूस केली असता काही तरुणांनी हिमतीने या बाबत गुप्त माहिती दिली असता.या बाबत गोष्टीची ‘ठोस प्रहार’ तात्काळ दखल घेतली. व ही बाब 4 मार्च रोजी बातमी प्रसिद्ध करून ही बाब उघडकीस आणली असता.
वाचनालयाच्या ठिकाणी त्या दिवसापासून कोणीही जुगार खेळतांना दिसत नाही.
असे ‘ठोस प्रहार’ शी बोलतांना तरुणांनी समाधान व्यक्त केले.
व आता त्या वाचनालयाला एक शिक्षणाचा चा दर्जा प्राप्त झाला. या बाबत गावातील तरुणांन कडून व वरिष्ठांना कडून बोलले जात आहे. सर्वत्र गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
गावतील तरुणांनी ‘ठोस प्रहार’ चे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button