India

पगार,पेन्शन आणि EMI साठी आरबीआय चे नवीन नियम…1 ऑगस्ट पासून हे आहेत नियम..

पगार,पेन्शन आणि EMI साठी आरबीआय चे नवीन नियम…1 ऑगस्ट पासून हे काय आहेत नियम

दिल्ली आरबीआय ने पगार, पेंशन आणि EMI पेमेंटसारख्या गरजेच्या ट्रान्जॅक्शनसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.आता कामकाजाच्या दिवसांसाठी थांबण्याची गरज नसेल.RBI ने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरींग हाऊसच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. 1 ऑगस्ट 2021 पासून हे नियम लागू होतील. आता तुम्हाला आपल्या पगार किंवा पेंशनसाठी शनिवार किंवा रविवार जाण्याची वाट पाहण्याची गरज नसेल.ही सेवा संपूर्ण आठवडा सुरू राहील.

बऱ्याच वेळा महिन्याचा पगार शनिवार किंवा रविवार आल्या मुळे पैसे काढता येत नाहीत किंवा खात्यात जमा होत नव्हते. त्यामुळे पगार बँकेच्या खात्यावर जमा होण्यासाठी शनिवार-रविवार जाण्याची वाट पाहावी लागत असे.आता RBI ने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार सुटीचे दिवस जाऊ देण्याची वाट पहावी लागणार नाही. या सेवा संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.यासाठी एक पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.
NACH एक बल्क पेमेंट सिस्टिम आहे. ज्याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संचलित करत आहे. याबरोबर विज बिल, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचे हफ्ते, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आणि विमा प्रीमियमचे पेमेंटची सुविधा मिळणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button