Maharashtra

अमळनेर तहसीलदारांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप नकेलेल्या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविला जिल्ह्याधिकारी कडे

प्रतिनिधी योगेश पवार

अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे,
त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्याती स्वस्त धान्य दुकान क्रमांक 135 चे मालक श्री. अशोक आनंदा पाटील यांनी माहे मार्च 2020 मधील शासकीय धान्य शिधापत्रिका धारकांना वाटप केलेले नसल्याचे दिसून आल्यानेे. त्याअनुषंगाने स्वस्त धान्य दुकान क्रमांक 135 हे स्वस्त धान्य दुकान रद्द करणेबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दि.27/032020 रोजी पाठविणेत आलेला असल्याचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पत्रक काढून कळविले आहे.

करोना विषाणु संसर्गाचे अनुषंगाने तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व शिधापत्रिका धारकांना धान्य वितरीत करणेत अपेक्षीत आहे.

तसेच त्या पत्रकात सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना कळविणेत आले आहे की, वेळेत सर्व शिधा पत्रिका धारकांना धान्य पुरवठा करावा. अन्यथा कडक कार्यवाही करण्यात येईल याची दुकाणदारांनी नोंद घ्यावी, असे ही सुचविले आहे.

या कार्यवाहीचा सर्व स्तरातील नागरिकांनी कौतुक ही केले व या कार्यवाही चे स्वागत करीत तहसीलदार मिलिंद वाघ यांचे अभिनंदन ही केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button