Amalner: शहरात राडा.. दोन गटात दगडफेक… दंगलीचे गुन्हे दाखल..!
अमळनेर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सायंकाळी शहरात रात्री 10 वाजेच्या सुमारास भोई वाडा, मण्यार मोहल्ला आणि त्यांनतर कासार गल्ली, दारू मोहला भागात अश्या चार ठिकाणी दोन गटात दगडफेक होऊन दंगलीचे वातावरण निर्माण झाले.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, सकाळी झालेल्या किरकोळ कारणावरून सायंकाळी त्याचे रूपांतर दंगलीत झाले. काही घरांवर, वाहनांवर, मोटरसायकलींवर दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच योग्य हस्तक्षेप केल्याने आणि शांतता पूर्ण मार्गाने परिस्थिती हाताळल्या मुळे वातावरण निवळले.
एक दोन पोलिसांना देखील दगड लागले. तात्काळ घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, विकास शिरोडे, अक्षदा इंगळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले. दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता झाली. यानंतर रात्री दिड वाजता दोन्ही गटांवर 16 आणि 6 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंदू मुस्लिम दंगल नुसार कलमे लावण्यात आली असून इतर कलमात 323,324,353 इ कलमांचा समावेश आहे. दरम्यान रात्रीच जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली असून परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे.






