Faijpur

फैजपुरातील नवीन व जुन्या कॉलनीतील काँक्रीटीकरणासाठी शासनाकडून दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर आमदार शिरीष चौधरी यांचे आभार

फैजपुरातील नवीन व जुन्या कॉलनीतील काँक्रीटीकरणासाठी शासनाकडून दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर आमदार शिरीष चौधरी यांचे आभार
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर शहरातील नवीन व जुन्या कॉलोनी भागातील रस्त्यावर खडीकरण व काँक्रीटीकरण साठी महाराष्ट्र शासन च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फैजपूर नगरपरिषद ला 2 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल शहरातील कॉलोनी भागातील नागरिकांनी आ. शिरीष दादा चौधरी यांची खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले *शहरातील कॉलोनी भागातील मंजूर कामे पुढील प्रमाणे 1) यावल रोडवरील वृंदावन कॉलोनी मध्ये खडीकरण व काँक्रिटिकरण करणे, 2) साने गुरुजी नगर वेल्डिंग वर्कशॉप पासून जानकी नगर पर्यंत काँक्रिटिकरण करणे, 3) साने गुरुजी नगर भाग 2 मधील संपूर्ण परिसरात काँक्रिटिकरण करणे, 4) लक्ष्मी नगर परिसरात काँक्रिटिकरण करणे, 5) मिरची ग्राऊंड भागात काँक्रिटिकरण करणे, 6) आसाराम नगर मधील ओपन स्पेस मध्ये बाल संस्कार केंद्र बांधणे. या व्यतिरिक्त ताहा नगर, न्हावी दरवाजा भागातील काही रस्ते ही मंजूर करण्यात आलेले आहेत, आभार प्रसंगी नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम तडवी, चंद्रकांत चौधरी, राहुल महाजन, मुरलीधर राणे, अशोक किरंगे गुरुजी, गणेश पाटील, राहुल फेंगडे, मनोज पाटील गुरुजी, सुरेश कोलंबे, कुंदन चौधरी सर, प्रशांत गाजरे, कमलाकर गुळवे, योगेश चोपडे, रमेश बोरोले, प्रशांत कपले, वासुदेव कपले सर, डॉ. हरी निळे, दिनेश किरंगे सर यांसह आदी नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button