कुस्तीगीर संघ सातारा तर्फे वैष्णवी दादासो धायगुडे हिणे 68 किलो वजन गटात वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत राज्यातून तिसरा क्रमांक
दिलीप वाघमारे
सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा तर्फे वैष्णवी दादासो धायगुडे हिणे 68 किलो वजन गटात वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारा आयोजित 22 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2019-20 आळंदी देवाची येथे दिनांक 20 व 21 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडली यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महिला कुस्तीगीर संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कुमारी वैष्णवी दादासो धायगुडे हिने 68 किलो वजन गटात सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तिने महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक प्राप्त करून सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे नाव मोठे केले.
तिच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाने , यांनी अभिनंदन केले






