Maharashtra

? आरोग्याचा मुलमंत्र काना चे आजार (Ear infection)

? आरोग्याचा मुलमंत्र काना चे आजार (Ear infection)

कानात संसर्ग काय आहे?

कानात संसर्ग हा मधल्या कानाचा संसर्ग असून, त्यामध्ये कानाच्या पडद्यामागे सूज येऊन तेथे द्रव जमा होतो. हे सर्दी (नासोफरींग्नायटिस), घसा दुखणे किंवा श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळे होऊ शकते. जरी हा संसर्ग कुणालाही होऊ शकत असला, तरी 6 ते 15 महिन्यांची मुलं याला अतिसंवेदनशील असतात. सुमारे 75% मुलांना 3 वर्षाचे होण्यापूर्वी हा आजार एकदातरी होतो. कानात संसर्गाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत:

कानात तीव्र संसर्ग.

संसर्गासोबत कानात इफ्युजन (कानाच्या पडद्याच्यामाघे असलेला एक चिकट द्रव पदार्थ).

तीव्र संसर्गासोबत कानात इफ्युजन

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सहसा, कानातील तीव्र संसर्गात, कानाच्या मधल्या भागात संसर्गाची काही लक्षणे वेगाने झालेले दिसून येतात आणि काही दिवसात कमी पण होऊन जातात. मुख्य लक्षणे याप्रकारे आहेत:

कान दुखणे.

ताप.

आजारी असल्यासारखे वाटणे.

अशक्तपणा.

किंचित बहिरेपणा- जर कानाच्या मधल्या भागात द्रव जमा झाला तर बहिरेपणा अनुभवला जाऊ शकतो.

कधी-कधी कानाच्या पडद्यात छिद्र पडू शकते आणि त्यातून पस वाहू शकतो. मुलांना कानात संसर्ग होण्याची काही इतर काही लक्षणे असू शकतात, जसे की

कान ओढणे, जोरात हिसका देणे किंवा घासणे.

चिडचिड, कमी जेवणे किंवा रात्रीच्या वेळेस अस्वस्थपणा.

खोकला किंवा नाक वाहणे

अतिसार.

हळू आवाज ऐकण्याची अक्षमता किंवा ऐकण्याच्या त्रासाची इतर चिन्हे जसे की दुर्लक्ष.

तोल न सांभाळता येणे.

नवजात बालकांमध्ये लक्षणांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे कारण ते मोठ्या मुलांप्रमाणे सांगू शकत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कधीकधी सर्दी कानाच्या मधात श्लेष्मा जमा होण्यासाठी कारणीभूत ठरते आणि म्हणूनच युस्टेशियन ट्यूब (एक पातळ नळी जी कानाच्या मधातून नाकाच्या मागच्या बाजूपर्यंत धावते) सूजते किंवा अवरोधित होते. श्लेष्मा योग्यरित्या काढून टाकला जात नाही म्हणून संसर्गामुळे सहजपणे कानाच्या मध्यभागी पसरतो. खालील कारणांमुळे लहान मुले कानात होणाऱ्या संसर्गास बळी पडतात:

युस्टेशियन ट्यूब ही प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये लहान असते.

मुलांचे ॲडेनॉइड प्रौढांपेक्षा मोठे असते.

काही परिस्थिती ज्या कानात होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढवतात, त्या या आहेत

क्लेफ्ट पॅलेट: एक जन्मजात दोष जिथे बाळाच्या तोंडाचा वरचा भाग फाटलेला असतो

डाउन सिंड्रोम : एक अनुवांशिक विकार ज्याचे वैशिष्ट्य काही प्रमाणात शिक्षण घेण्यास असमर्थता आणि असाधारण शारीरिक रचना हे असतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बहुतेक बाबतीत, कानाच्या संसर्गासाठी डॉक्टरांकडे जायची आवश्यकता नसते कारण तो काही दिवसात आपोआप बरा होतो. तरी, जर लक्षणं खराब होत असतील, तर सहसा ऑटोस्कोपचा वापर करून कानातील संसर्गाचे उपचार केले जातात. डॉक्टर ऑटोस्कॉपच्या मदतीने कानात द्रव पदार्थ आहे की नाही हे तपासतात ज्याने संसर्ग समजतो. जेव्हा उपचार प्रभावी नसतील आणि कॉम्पिकेशन्स वाढत असतील तर टायपॅनोमेट्री, ऑडीयोमेट्री आणि सीटी / एमआरआय स्कॅन यासारख्या पुढील चाचण्या आवश्यक आहेत. आणि सामान्यत: या चाचण्या आपल्या कान, नाक आणि घशाचे (ईएनटी-ENT) डॉक्टर सांगतात.
उपचार असे असू शकतात,:

तोंडी अँटीबायोटिक्स किंवा इअर ड्रॉप्स.

औषधं (वेदना आणि तापासाठी).

कालबद्ध निरीक्षण.

ग्रोमेट्स- ज्या मुलांच्या कानामध्ये वारंवार संसर्ग होतो त्यांच्या कानाच्या पडद्यामागे भूल देऊन (त्रास न होता) ग्रोमेट नावाच्या लहान नळ्यांनी द्रव काढून टाकतात. ही प्रक्रिया करायला साधारणतः मिनिट लागतात आणि रुग्णाला त्याच दिवशी दवाखान्यातून सोडण्यात येते.

वेदना किंवा ताप कमी करण्यासाठी मेडिकल स्टोरमध्ये मिळणारे पेनकिलर्स जसे की पेरासिटामॉल आणि इबूप्रोफेन दिले जातात.

स्वः काळजी:

जेव्हा पर्यंत लक्षणं कमी होत नाही तेव्हा पर्यंत प्रभावित कानांवर गरम मऊ कापड ठेवल्याने देखील वेदना कमी होऊ शकतात.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button