जागतिक पर्यावरण दिन व डॉ. आर. आर. शेख यांचा वाढदिवस ऑर्बिट स्कूलमध्ये वृक्षारोपण करून साजरा..
लक्ष्मण कांबळे लातूर
लातूर : आज जगात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून असंतुलित वातावरणामुळे पावसाअभावी अनेक भाग दुष्काळाच्या भोवऱ्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची गरज आहे, असे मत औसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांनी ऑर्बिट स्कूल नबी नगर औसा येथे व्यक्त केले.या वेळी पाणी पूर्वाठाचे अध्यक्ष गोविंद जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आज सोशल एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटीच्या वतीने मेहताब साब पटवारी एज्युकेशन सोसायटी व लातूर रिपोर्टर परिवार, ऑर्बिट प्री प्रायमरी स्कूल, नबी नगर औसा जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य अधिकारी डॉ. आरआर शेख व औसा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव यांना झाडे देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण यावेळी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सोशल सोसायटीचे सचिव अझर हाश्मी, ज्येष्ठ पत्रकार मु मुस्लिम कबीर, वकील इकबाल शेख, मजरुद्दीन पटेल, हुसेन पटेल, पत्रकार इलियास चौधरी, आसिफ पटेल आफताब शेख, मुख्तार मणियार, उमर शेख, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.






