यावल शहरात एकाची आजाराला कंटाळून आत्महत्या तर पाचव्या दिवशी आढळून आला मृतदेह
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
यावल : शहरातील ५४ वर्षीय व्यक्तीने आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असून पाचव्या दिवशी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत दिसून आला.
यावल शहरातील आझादनगर परिसरात राहणारे ५४ वर्षीय मोहम्मद हनीफ बाबू हे दि. ३० जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास खडकाई नदी जवळच्या काठावर शौचासाठी गेले होते. बराच काळ होऊन देखील परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता काठावर शौचास घेऊन गेलेल्या पाण्याचा डबा दिसून आला.
याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गावकरी यांच्या मदतीने मोहम्मद हनीफ यांचा मृतदेह त्या विहिरीतून काढण्याचा वारंवार प्रयत्न केले असता देखील ते मिळून आले नाही. अखेर ४ जुलै रोजी सकाळी या व्यक्तीचे प्रेत दुर्गंधी येत असल्याने कुजलेल्या अवस्थेत त्या विहिरीतच मिळून आले. यासंदर्भात सरफराज खान अय्युब खान यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






