Lonand

लोणंद शहरांमध्ये अंगणवाडी बाल आनंद सांस्कृतिक मुलामुलींचा कार्यक्रम संपन्न

लोणंद शहरांमध्ये अंगणवाडी बाल आनंद सांस्कृतिक मुलामुलींचा कार्यक्रम संपन्न

दिलीप वाघमारे

लोणंद येथे 4 फेब्रुवारी 2020 रोजी भवानी माता मंदिर बाजारतळ याठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प विभाग यांच्यावतीने अंगणवाडी बाल आनंद सांस्कृतिक मुला-मुलींचा कार्यक्रम शुभारंभ स्नेहलता शेळके पाटील माजी नगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते शैलेजा खरात नगरसेविका यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी सुनंदा नेवसे मॅडम प्राचार्य मालोजीराजे विद्यालय यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बालगोपाळांची कला नृत्य पाण्यासाठी बहुसंख्येने गर्दी केली होती.

लोणंद शहरांमध्ये अंगणवाडी बाल आनंद सांस्कृतिक मुलामुलींचा कार्यक्रम संपन्न

याप्रसंगी बाजारतळ ठोंबरे वस्ती चोपण वस्ती दत्त मंदिर भिशे वस्ती बाळासो नगर या ठिकाणांची मुलं-मुली विविध वेशभूषा करून गाण्याच्या तालावर ती बेधुंद नाचत होती आणि ग्रामस्थ बालवाडी शिक्षका त्यांचे सहकारी आनंद घेत होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिंगमिरे मॅडम मोरे मॅडम खरात मॅडम सर्वात बालवाडी शिक्षक यांनी परिश्रम घेऊन आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button