Amalner

Amalner: माळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ असावे तसेच ओबीसी आरक्षणात स्वतंत्र कोटा असावा..अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांची मागणी

Amalner: माळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ असावे तसेच ओबीसी आरक्षणात स्वतंत्र कोटा असावा..अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी :- अखिल भारतीय माळी महासंघाचा दि. १९ जुलै या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त काशी माळी मंगल कार्यालय, नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली चिंतन बैठक संपन्न झाली. बैठकीस मानद अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त अँड., संभाजी पगारे, श्री. डी.के.माळी,
ठाणे, शिवदास महाजन, पुणे, राजाराम काठे, नशिक, सौ. तारका सुभाष विवरेकर या सहा संस्थापक
विश्वस्तांसह राष्ट्रीय कार्यकारिणीतील डॉ. सुनिल जाधव, परभणी भाउसाहेब मंडलीक, अकोले,विजयराव सोनवणे, पिंपळनेर, उध्दवराव माळी, चाळीसगांव, तेलंगणा राज्याचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुकूमार पेटकूले, आदिलाबाद, डॉ. शाम फूले, सुरत, सुरत माळी समाज अध्यक्ष सुधाकर चौधरी अध्यक्षांचे सचिव
काशिनाथ माळी, युवक आघाडी प्रमुख नितीन शेलार, मालेगांव, चंद्रकातजी खोडे, नाशिक, संतोष पुंड,नाशिक. प्रदेश कार्यकारिणीतील महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा अहिरे, पुणे, नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, शिरपूर, वासुदेव माळी, नंदुरबार, विजय महाजन, एरंडोल, धुळे जिल्हाध्यक्ष
आर.के.माळी, नाशिक ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमासे, नाशिक शहराध्यक्ष विलास वाघ, धुळे महानगराध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे, धुळे महानगर कार्याध्यक्ष राजेंद्र गवळे, धुळे महानगर सरचिटणीस ज्ञानेश्वर
माळी, धुळे जिल्हा कर्मचारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र माळी, नाशिक विभाग प्रसिध्द प्रमुख राजेंद्र गवळे,
पिंपळनेर, महेश ढोले नाशिक, विकास सोनवणे, नाशिक, निंबाजी थोरे, हिंगोली, आनंदराव गिराम, हिंगोली, मधुसूदन थोरे, परभणी, शेषराव थोरात, परभणी, भिमसिंग चिंचाणे, पाथरी, साहित्यीक उत्तम कोळगांवकर, डॉ.नागोराव जांबूतकर, वसमत, सौ. शालिनी बुंदे, छत्रपती संभाजी नगर, भरत रोकडे,
शिरपूर, सौ.वैशाली प्रमोद महाज, मालेगांव, शिवराम पवार, मालेगांव विशेष निमंत्रित सदस्य बाजीराव
तिडके, नाशिक, विजय राउत, नाशिक, राकाशेठ माळी, नाशिक, रविंद्र महाजन, एरंडोल, दिनेश माळी, अमळनेर, रमेश राउत, नाशिक, शरद मंडलीक, नशिक.
चिंतन बैठकीच्या सुरूवातील अनुराग जगदाळे याने महात्मा फुलेंवर गीत गायन करून सुरूवात केली. या बैठकीस महाराष्ट्रासह तेलंगाणा व गुजरात राज्यातून समाजबांधव उपस्थित होते. या
प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महासंघाने काय करावे यावर
आपले विचार मांडले. शेवटी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी आपल्या भाषणात
बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी
विविध मागण्या आपण शासनाकडे केल्या पाहिजे असे सुचविले. त्यानुसार त्यांनी पुढील प्रमाणे ठराव मांडले व त्यास सर्वांनी टाळ्या वाजवून मान्यता दिली.
ठराव :-
१) माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे.
२) ओबीसी आरक्षणात माळी समाजाला स्वतंत्र कोटा द्यावा.
३) महात्मा जोतीराव फुले व सावित्री आई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा.
४) महाराष्ट्र शासनाने संत शिरोमणी सावता महाराज यांचे समाधीस्थळ अरण ता. माढा, जि. सोलापूर यास
“अ” दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करून त्याचा विकास करावा.
५) २०२१ मध्ये सुरू झालेल्या जनगणनेत ओबीसी संवर्गाची जातवार जनगणना करावी. यासाठी
जनगणना फॉर्म मध्ये स्वतंत्र रकाना द्यावा. महाराष्ट्र शासनानेसुध्दा ओबीसीची स्वतंत्रपणे जातवार
जनगणना करावी.
६) ओबीसी संवर्गासाठी लागू करण्यात आलेली “क्रिमीलेअरची” जाचक अट रद्द करावी.
७) “क्रिमीलेअरची” जाचक अट रद्द होत नाही तोपर्यंत ऑक्टोबर २०१५ मध्ये राष्ट्रीय मागस वर्ग आयोगाने “क्रिमीलेअरची” मर्यादा १५ लाख असावी अशी शिफारस केली आहे ती शासनाने
स्विकारावी.
८) ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे.
९) महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले यांचे वर चित्रपट निर्माण करण्याचे घोषित केले आहे. त्याची
पूर्तता करून त्याचे प्रदर्शन करावे.
१०) मा.ना.छगनरावजी भुजबळ व मा. ना. अतुलजी सावे यांचा मंत्री मंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून समावेश
केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन.
११) आकाश पोपळघट, हिंगोली या माळी समाजातील गरीब परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्याने
एम. आय. टी. विद्यापीठात गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळविला त्याचे अभिनंदन.
१२) महाराष्ट्र शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरू करण्याची घोषणा केली
आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी.
१३) तेलंगणा राज्यात माळी समाजाला एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे असा ठराव विधान सभेत पारीत
करून केंद्र सरकारला शिफारस केली आहे. तेलंगणा सरकारचे अभिनंदन.
बैठकीचे प्रास्ताविक शिवदासजी महाजन पुणे यांनी केले. सुत्रसंचालन काशिनाथ माळी यांनी केले. आभार प्रदर्शन विजय सोनवणे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button