Maharashtra

अंगणवाडी सेविकांना कोविड-१९स०र्हक्षणाचे काम देण्यांत येऊ नये

अंगणवाडी सेविकांना कोविड-१९स०र्हक्षणाचे काम देण्यांत येऊ नये !

अंगणवाडी सेविकांना कोविड-१९स०र्हक्षणाचे काम देण्यांत येऊ नये

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

आयुक्त – इंद्रा मालो यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संघटक सचिव-भानुदास पाटील
मुंगसे,ता.अमळनेर दि.१९(वार्ताहर)–मार्च 2020पासून राज्यात कोविड-19चा प्रादुर्भाव सुरू असून सदर महामारीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील ,ग्रामीण आदिवासी व नागरी भागातील अंगणवाडी सेविकांना कोविड-19 च्या सर्व्हक्षनाचे कामकाजामुळे अंगण वाडी सेविकांच्या मूळ कामकाजवर परिणाम होत आहे.तसेच शासनाच्या संदर्भीय पत्र-क्रमांक -1जुलै 2020 नुसार o ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वजन,ऊंची, घेऊन ग्रोथ मॉंनिटरिंगचे कामकाज करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच अनुषगाणे आयुक्त कार्यल्याचे संदर्भीय पत्र क्रमांक – 2 अन्वये राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना ग्रोथ मॉनिटरींग कामकाज करणे बाबत सविस्तर सुचना निर्गमित करण्यांत आलेल्या आहेत . ग्रोथ मॉनिटरीग करण्या नंतरच कुपोषित बालकाची सॅम- मॅम आकडेवारी निश्चित करणे शक्य होते . त्यानंतरच कुपोषण व बालकांचे प्रमाण कमी करणेसाठी उपाययोजना करने शक्य होते .
अंगणवाडी सेविका या अत्यंत संवेदनाशील घटकांसाठी ०ते ६ वर्ष वयोगटातील बालक व गरोदर स्त्रिया, स्तनदामाता .. कामे करीत असतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणाचे विविध कामे दिल्यामुळे अंगणवाडी सेविका कोरोणा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे . अंगणवाडी सेविका पॉझिटिoह झाल्यांस ०ते ६ वर्ष वयोगटातील बालके , गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, हे अंत्यत संवेदनक्षम घटकांवर कोविड-१९ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही !
या पत्रान्वये यापुढे अंगणवाडी सेविकांना संपूर्ण लोकसंख्येचे कोविड-१९स०र्हक्षणाचे कामे देण्यांत येऊ नयेत !फक्त अंगणवाडी कार्यक्षेत्रातील ०ते ६ वर्ष वयोगटातील बालके , गरोदर स्त्रिया . स्तनदामाता,यांचेशी संबधित स०र्ह क्षणाचे कामकाज देण्यांत यावे व ग्रोथ मॉनिटरींगचे काम करतां येईल . असे आयुक्त मॅडम इंद्रामालो .एकात्मिक बालं विकास सेवा योजना मुंबई यांनी दि .१९ जुलै २० रोजीच्या पत्रान्वये .मा. जिल्हाधिकारी सो जळगांव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( बा .क़ .वि. )जळगांव . तसेच तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व यांना कळविले आहे . असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ जळगांवचे संघटक सचिव भानुदास पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे ..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button