Dhule

‘या’ ठिकाणी सापडले 2 हजार वर्षांपूर्वीचे धातूचे जैन मंदिर!

‘या’ ठिकाणी सापडले 2 हजार वर्षांपूर्वीचे धातूचे जैन मंदिर!
धुळे : शेतात बैलजोडीने वखरणी करत असताना तब्बल 2 हजार वर्षांपूर्वीची धातुचे चारमुखी मंदीर आढळून आले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रामी येथे राहणारे रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करतांना हे प्राचीन काळातील धातूचे चारमुखी मंदिर सापडले आहे.
याबाबत दोंडाईचा पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली असून मंदिर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे.
*असे आहे पुरातन चारमुखी मंदिर.*
सदरचे मंदीर 11 इंचचे असून चौमुखी आहे. मंदिरात प्रमुख चार जैन भगवंतांच्या मुर्त्या आहेत. तसेच 48 जैन भगवंतांच्या लहान मुर्त्या आहेत. सदर मंदिर हे धातुचे आहे. आकर्षक कोरीव कामांसह मंदिरावर कळस आहे. मंदिरातील प्रमुख चार मुर्त्यांचे पायथ्याशी लिखाण केलेले आहे. मंदिराचे वजन 4 किलो 250 ग्रॅम एवढे आहे
मंदिर सापडल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ दखल घेवून पुरातत्व विभागालाही माहिती दिली.
त्यानंतर रितसर पंचनामा करण्यात आला. मंदिराचा पंचनामा करून मंदिर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button