Maharashtra

शताब्दी निमित्त अण्णाभाऊ चे कार्य तळागाळा पर्यंत घेऊन जाणार -आमदार शिरिष चौधरी

शताब्दी निमित्त अण्णाभाऊ चे कार्य तळागाळा पर्यंत घेऊन जाणार -आमदार शिरिष चौधरी

शताब्दी निमित्त अण्णाभाऊ चे कार्य तळागाळा पर्यंत घेऊन जाणार -आमदार शिरिष चौधरी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99 व्या जयंती व येणारी जन्मशताब्दी वर्षाची सुरवात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
 अमळनेर येथील धुळे रोड वरील  आण्णाभाऊ साठे स्मारकाच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पन अमळनेर चे कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करुन  विनम्र अभिवादन केले. 
यावेळी त्यांनी उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य भारतातील कष्टकरी , शोषित तसेच कामगारांना न्याय मिळवून देणारे होते, त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अनिष्ट प्रथा वर आसूड ओढलेले आहे, त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी मानून सामाजिक कार्यात मोठा  सहभाग घेतला होता. अण्णांचे पुढील वर्ष हे शताब्दी वर्ष असल्याने आम्हीं त्यांचे कार्य तळागाळातील समाज बांधवां पर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असे सांगून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
या वेळी प्रा जयश्री साळुंके यांनी देखील आण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
 या प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे  जिल्हाध्य्क्ष प्रकाश बोरसे,तालुका अध्यक्ष संजय मरसाळे ,शहराध्यक्ष सुरेश कांबळे,प्रा.जयश्री साळुंके, जितु कढरे,बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका अध्यक्ष संदीप सैदाने,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रा विजय गाढे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बैसाने, संजय थोरात,हरीचंद्र कढरे,बाळा चंदनशीव,नारायण गांगुर्डे,अनिल मरसाळे, उत्तम वानखेडे,सोमनाथ खैरनार, प्रेम बोरसे, विजय वैराळे, आशाबाई बोरसे, विमल ताई कढरे,सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली पवार, पंडित गायकवाड सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे सुनील करंदीकर, सत्तार खान, गौतम बिऱ्हाडे, मिलिंद निकम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button