Amalner: गावठी दारू विक्रीवर कार्यवाही…
अमळनेर मारवड पोलिसांनी तालुक्यातील अंतूर्ली येथे गावठी दारू विकणाऱ्या एकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याजवळ १२०० रुपये किमतीची ३० लिटर दारू जप्त केली आहे.
याबद्दल सविस्तर दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील अंतूर्ली येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती सपोनि शितलकुमार नाईक यांना मिळाल्याने त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पीएसआय विनोद पाटील, हे कॉ संजय पाटील, सुनील आगोणे, पो कॉ अनिल राठोड यांनी छापा टाकला. यावेळी अंतूर्ली ते तासखेडा पुलाजवळ बोरी नदीच्या काठी दीपक महादू भील हा गावठी दारू विक्री करताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याजवळ १२०० रुपये किमतीची ३० लिटर दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीवर नाश करण्यात आला. मारवड पोलीसात दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ संजय पाटील करीत आहे.






