ठोस प्रहार बातमीचा दणका..गवताचा भनका..जागी झाली न प
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे असलेल्या घाणी संदर्भात आणि पुतळ्या च्या अवती भोवती वाढलेल्या गवता संदर्भात काल ठोस प्रहारने जागो न प प्यारे ह्या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांना जाग आणली होती. परिणामी आज सकाळी सकाळी न प चे अधिकारी व कर्मचारी हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे उपस्थित झाले व त्यांनी परिसर स्वच्छता मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यातील साफ सफाई करण्यात आली असून अजूनही थोडे काम बाकी आहे. लवकरच सर्व परिसरातील साफ सफाई पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
आज सकाळी आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, सहा निरीक्षक संतोष चव्हाण यांच्या सह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील साफ सफाईस सुरुवात केली आहे.







खूप छान