Pandharpur

पंढरपुर मंगळवेढा पोटनिवडणुकीत आदिवासी कोळी महादेव समाजात सत्ताधारी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपा पक्षाबाबत प्रचंड असंतोष– बाळासाहेब बळवंतराव

पंढरपुर मंगळवेढा पोटनिवडणुकीत आदिवासी कोळी महादेव समाजात सत्ताधारी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपा पक्षाबाबत प्रचंड असंतोष– बाळासाहेब बळवंतराव

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपुर स्वर्गीय आ.भारतनाना भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुक लागली असुन प्रचार शिगेला पोहचला आहे. या मतदारसंघात आदिवासी कोळी महादेव समाजाचे निर्णायक मतदान असुन सताधारी महाविकास आघाडीच्या व भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न या दोन्ही पक्षाच्या सरकारने सोडवला नाही. त्यामुळे समाजात या दोन्ही पक्षाविषयी प्रचंड नाराजी व असंतोष आहे असे ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ह्युमन[आफ्रोह] संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब बळवंतराव यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले आहे. राज्यघटनेच्या ३४२ व्या कलमान्वये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी , डोंगर कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली परंतु या जमातीला जाचक अटी लावुन घटनादत्त अधिकारापासून जाणीवपुर्वक वंचित ठेवले आहे. राज्यात एकुण आदिवासीची नऊ टक्के लोकसंख्या असुन अनुसुचित क्षेत्रात चार टक्के व विस्तारीत क्षेत्रात पाच टक्के आदिवासी राहतात असे संशोधन समितीच्या अहवालात नमुद केले आहे.विकास निधीही नऊ टक्के दिला जातो राजकीय आरक्षणही नऊ टक्के दिले असुन २५ आमदार व ४ खासदार निवडून येतात.विस्तारीत क्षेत्रातील पाच टक्के लोकसंख्येच्या नावाने विकास निधी व पाच टक्केप्रमाणे १४ आमदारांचे राजकीय आरक्षण व सरकारी नोकऱ्या मधील आरक्षण हडप करण्यासाठी २५ आमदार सातत्याने जातपडताळणी समितीवर व सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकुन जाणीवपुर्वक विस्तारीत क्षेत्रातील ३३ आदिवासी जमातीवर अन्याय करतात जातचोर, बोगस, खोटे, घुसखोर असे शब्द वापरून आदिवासींचा अपमान करुन घटनादत्त अधिकारापासुन वंचित ठेवले आहे.
पंढरपुर मंगळवेढा तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीकडे अनेक महादेव कोळी आसल्याचे पुरावे आहेत. पंढरपुरचा कोळी हा शिवपुजक असुन पंढरपुर शहरातील प्राचीन शिवमंदीराचे पुजक कोळी असुन त्याचे उत्पन्नही कोळी लोकांच्याकडे जाते .माधुरी पाटीलच्या निकालामध्ये सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे की समुद्र किनारपट्टीवर राहणारा कोळी व परंपरागत मासेमारी करणारा , मिठागरात काम करणारा कोळी ओबीसी अथवा एसबीसीत आहे . उर्वरीत महाराष्ट्रात राहणारा कोळी , जरी त्यांच्या नोंदी मानिव दिनांकापुर्वी फक्त कोळी आसल्या तरी तो अनुसुचित जमातीमधील कोळी आहे असे स्पष्ट म्हटले असुन विस्तारीत क्षेत्रातील आदिवासीनां सवलती मिळाव्यात म्हणुन १९५६ला लादलले क्षेत्रबंधन १९७६ ला भारतीय संसदेने कायदा करुन संपुष्टात आणले असून या कायद्यानुसार कोष्टल एरियातील कोळी सोडुन उर्वरीत महाराष्ट्रातील कोळी अनुजमातीच्या सवलतीस पात्र झाला आहे.पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदान क्षेत्रात आदिवासी कोळी जमातीचे ३५ हजार मतदान आहे. प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या आहेत. परंतु एकाही नेत्याने आदिवासी कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राचा व वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवु असे आश्वासन दिले नाही त्यामुळे समाजात सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रचंड असंतोष खदखदत आहे. जो कोण जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुरळीत देण्याचे आश्वासन देईल, समाज त्यांचाच विचार करण्याच्या मनस्थितीत आहे. अन्यथा समाजावरील होणाऱ्या अन्यायाला मतदान रुपी योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही . या मतदारसंघात आदिवासी कोळी समाज ज्या पक्षाच्या मागे उभे राहील तोच उमेदवार निवडून येईल अशी एकंदर स्थिती आहे आहे असे आर्गनायझेशन राईटस ऑफ ह्युमन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button