Mumbai

Mumbai Breaking: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! आता माती परीक्षण नमुना पोस्टाद्वारे पाठविता येणार..!

Mumbai Breaking: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! आता माती परीक्षण नमुना पोस्टाद्वारे पाठविता येणार..!

मुंबई कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत माती परिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार. याशिवाय शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी नमुना पाठविण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पोस्टाद्वारे माती परीक्षणाला चांगला प्रतिसाद दिला तर वेळ आल्यास विद्यापीठातील माती परिक्षण केंद्रांची संख्याही वाढवली जाईल असेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button