Rawer

? खिर्डी ते बलवाडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेल का?असा सवाल वाहन चालकांनी केलाय.

खिर्डी ते बलवाडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेल का?असा सवाल वाहन चालकांनी केलाय

भीमराव कोचुरे

खिर्डी ते बलवाडी हा अवघा पाच किलोमीटरच्या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण होवून पाणंद रस्ते तयार झाले आहे.या रस्त्यावर लाखो रुपये खर्च होवूनही रस्त्याची अवस्था मात्र जैसे थे च आहे.या रस्त्यावर खड्ड्यांनी थैमान घातले असून रहदारीचा प्रश्न मात्र चांगलाच ऐरणीवर आला आहे.त्यातच रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्या खोदून ठेवल्याने समोरून येणार्या वाहनास पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. अपघातांच्या प्रमानात वाढ होत असल्याने वाहन धारक.शेतकरी. व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्यावरुन नागमोडी वळण घेत संथ गतीने वाहतूक होत असल्याने अनेक वाहन चालकांना पाठ दुखी व कंबर दुखीचे सारखे आजार जडलेले आहे.ज्या रस्त्याला पार करण्यास दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागत होता.तोच रस्ता पार करण्यास अर्धा तास लागतो.त्यातच दुचाकी,चारचाकी,इ. वाहनांसह सायकलींचे ही मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.

रस्त्यावर पडलेल्या सतराशे साठ खड्ड्यां न मधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.तसेच खड्डे चुकवितांना मोटर सायकल स्लीप होवून वारंवार अपघात होत असल्याने खड्ड्यांच्या या रस्त्यावर एखादी व्यक्ती दगावल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.लांब पल्ल्याच्या गाड्या याच रस्त्याने ये – जा करत असल्याने गाड्यांची ही खिळखिळी अवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे.सदरील रस्त्याचे नव्याने काम होणे गरजेचे आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागास मुहूर्त कधी मिळतो.असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.

आमचे प्रतिनिधी यांनी मोबाईल वर संपर्क साधला असता लवकरच रस्त्याचे चे कामाला सुरुवात होईल ठेकेदाराला काम सुरू करणे बाबत तोंडी व लेखी सूचना देण्यात आली आहे. असे PWD उपअभियंता शेख साहेब यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button