वनगळीतील युवकांनी वाचवले दुर्मिळ पक्षाचे प्राण..प्रतिनिधी दत्ता पारेकरपुणे : आज दुपारी इंदापूर तालुक्यातील वनगळी गावात नाना विष्णु पारेकर यांच्या सामुहिक विहरीमध्ये पेलिकन जातीचा पक्षी पडलेला नागनाथ विष्णु पारेकर मोहन मचिंद्र पारेकर अमोल सुरेश पारेकर यांना पडलेला पाहिले .विहिर ही ४५ फुट खोल आहे. विहिरीला निम्या पर्यतच पायर्या असल्याने खाली उतरन्याचे धाडस करत नव्हते पंरतु सुहास नाना पारेकर रोहन राजेंद्र पारेकर व गणेश सुखदेव पारेकर हे मोठ्या धाडसाने विहरित उतरले किरण राजाराम पारेकर व प्रमोद चौधरी यांनी त्यांनी रस्सीच्या साह्याने विहरीमध्ये सोडले व या पेलिकन पक्षाचे प्राण वाचवले.. सुहासने सांगितले कि हि प्रेरणा निसर्ग माझा सखा या निसर्ग प्रेमी ग्रुप सोलापुर यांच्याकडून मिळाली आहे.
पक्षी अभ्यासकांच्या मते हा पक्षी अन्नाच्या शोधात या ठिकाणी आला असावा व ते आपले भक्क्ष शोधत असताना विहरीत पडलेला असावा. या पक्षांस विहरीतुन वरती काढल्या नंतर स्वथ्थाचे रक्षण करण्यासाठी युवकांना चावा घेण्याचा पण प्रयत्न केला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले
तुकाराम कैलास पारेकर रवि जाधव आणी सागर विश्वनाथ पारेकर यांनी या पक्षाला त्या पक्षाचे समुह असणार्या उजनी काठावर ठिकाणी सोडले.
हे सर्व काम युवकांनी कोराना पासुन काळजी घेत व्यवस्थित अंतर ठेवुन केले आहे.
या युवकांच्या धाडसाचे कौतुक वनगळी गावाचे माजी सरपंच हिरालाल पारेकर उपसरपंच पांडुरंग पारेकर धनाजी पारेकर अॅड अनिल पारेकर तुकाराम विठ्ठल पारेकर सुधीर पारेकर दिपक पाटील व इतर ग्रामस्थ वसोशलमीडियावरील नेटकरी करीत आहेत





