माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी…
मुंबई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपली आहे. अनिल देशमुख यांना २९ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची मेडिकल चेकअप झाले.
कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायायलीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढला आहे. अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत संपली. यामुळे देशमुखांना कोर्टात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. याआधी शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायलायाने देशमुखांच्या ईडी कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली होती. आज मुदत संपल्यामुळे पुन्हा देशमुखांना न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात अनिल देशमुखांच्या वकिलांनी ईडी कोठडी वाढवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणातील अन्य आरोपी सचिन वाझेला अद्याप अटक का केली नाही. तसेच परमबीर सिंग यांना चौकशीसाठी का बोलावण्यात आले नाही, असे प्रश्न देशमुखांच्या वकिलांनी उपस्थित केले होते.






