Maharashtra

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आज श्री विश्वासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल , जानवे,ता. अमळनेर , जिल्हा जळगाव येथे वृक्षारोपण प्रतिनिधी

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आज श्री विश्वासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल , जानवे,ता.  अमळनेर , जिल्हा  जळगाव येथे वृक्षारोपण 

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आज श्री विश्वासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल , जानवे,ता. अमळनेर , जिल्हा जळगाव येथे वृक्षारोपण प्रतिनिधी

प्रतिनिधी  अविनाश पवार

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आज श्री विश्वासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल , जानवे,ता.  अमळनेर , जिल्हा  जळगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. लहान मुलांना बालपणापासूनच जर  पर्यावरणाचे धडे दिलेत तर  भविष्यात ते पर्यावरणा बाबतीत जबाबदार नागरिक बनतील . काळाची हीच गरज  श्री विश्वासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल ने ओळखून हा कार्यक्रम सर्व लहान मुले आणि कर्मचारी वर्ग यांचे उपस्थित पार पाडला . झाडे लावताना चिमुरडयांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता .    या प्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे चेअरमन श्री विलासराव पाटील यांनी सौ मनीषा चौधरी , डॉ ए. पी .जे .अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या नासिक विभागाच्या समन्वयक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  सौ मनीषा चौधरी  यांनी    डॉ ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे सन्मान करत फाऊंडेशन तर्फे प्रमाणपत्र शाळेस दिले.  वृक्षारोपण प्रसंगी  संस्थेचे चेअरमन श्री विलासराव पाटील , मुख्याद्यापक श्री अमोल निकुंभ , श्रीमती संगिता देवरे ,श्रीमती निकिता पाटील, श्रीमती रुपाली पाटील, श्री अशोक साळुंखे ,श्री प्रवीण पाटील, श्री मधुकर पाटील आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मुख्याद्यापक श्री अमोल निकुंभ  आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button