Faijpur

नहावी गावात सोशल डिस्टन्स चे पालन करून आदर्श विवाह संपन्न

नहावी गावात सोशल डिस्टन्स चे पालन करून आदर्श विवाह संपन्न

सलीम पिंजारी

फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी तालुका यावल गावात सोशल डिस्टन्स चे पालन करीत पार पडला आदर्श विवाह..
फैजपूर प्रतिनिधी यावल तालुक्यातील न्हावी येथे सोशल डिस्टन्स चे पालन करीत मोजक्या दहा ते बारा लोकांच्या उपस्थित आदर्श विवाह पार पडला. अत्यंत साध्या पद्धतीने व अनावश्यक खर्चाला फाटा देत आदर्श विवाह नर्वा इलेक्ट्रिकल्स येथे पार पडला. रमेश सिताराम कोलते यांचे पुत्र धनंजय रमेश कोलते प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद शिक्षक कार्यरत आहे व ची सौ का चारुलता कै संजय टिकाराम ठोंबरे रा. डो. कठोरा दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. यावेळी केवळ वर-वधू सह वरांचे आई-वडील वधूचे मामा व काका ब्राह्मण अशा मोजक्या लोकांच्या उपस्थित होते यावेळी फिजिकल डिस्टन्स पालन तसेच मास्कचा वापर व सेनी टाईजर चा वापर करण्यात आला या आदर्श विवाहाचे न्हावी सह परिसरात कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button