sawada

केळी वर तणनाशक फवारून शेतकर्‍यांचे लाख रुपयाचे नुकसान..चिनावल परिसरातील शेतकरी त्रस्त

केळी वर तणनाशक फवारून शेतकर्‍यांचे लाख रुपयाचे नुकसान..चिनावल परिसरातील शेतकरी त्रस्त

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यातील चिनावल व परिसरात शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान करण्याची मालीका सुरुच असून आज दि ६ रोजी चिनावल शिवारातील चंद्रकांत चुडामण पाटील या शेतकऱ्यांच्या नविन केळी बागेतील सुमारे १५०० केळी घडावर अज्ञात व्यक्तींनी तण नाशक फवारलल्याने सदर शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची बाब समोर आल्याने शेतकर्‍यां मध्ये खळबळ माजून भिती व्यक्त केली जात आहे
या बाबत सविस्तर असे की चिनावल शिवारातील कोचूर रस्तत्यावर चंद्रकांत पाटील यांनी व गणेश हरि नेमाडे यांनी सहा हजार केळी ची लागवड केली आहे यात नविन केळी च्या सुमारे १५०० ते १६०० केळी घडावर सदर शेतकर्‍यांचे नुकसान करण्याचे हेतूने दि २ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान अज्ञात व्यक्तींनी तण नाशक फवारलल्याने या शेतकऱ्याला आज दि ६ रोजी लक्षात आले या मुळे सदर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे
दरम्यान या घटनेची माहिती परिसरात होताच शेतकरी मध्ये मोठी खळबळ माजली सदर शेतकरी चंद्रकांत पाटील, गणेश नेमाडे यांनी या बाबत सावदा पोस्टे ला माहिती दिली सदर घटनास्थळी सावदा पोस्टे चे सपोनी जलिदर पळे व कर्मचाऱ्यांनी भेट देत नुकसानी ची पाहणी केली व या बाबत चंद्रकांत पाटील यांनी सावदा पोस्टे ला या बाबत तक्रार दाखल केली असून भादवी कलम ४४७ ,४२७ द्वारे नोंद करण्यात आली आहे
दरम्यान वारंवार शेतकर्‍यांच्या केळी व पिकाचे नुकसान या परिसरात मोठी नाराजी व्यक्त होत आहे या बाबत शेतकरी नी आंदोलन हि केली तर थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक याची भेट घेऊन या अपप्रवृत्ती च्या लोकांचा बंदोबस्त करणयाची मागणी केली तरी सुद्धा तपास लागत नसल्याने शेतकर्‍यांन मध्ये मोठा असंतोष पसरला आहे त्यातच आज ६ रोजी पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आज पुन्हा एकदा परिसरातील शेतकरी एकत्र येत या अपप्रवृत्ती च्या लोकांचा बंदोबस्त करणयाची मागणी केली सदर वेळी शेतकरी चंद्रकांत पाटील, गणेश नेमाडे, याचे सह श्रीकांत सरोदे, ठकसेन पाटील, दामोदर महाजन, पकंज नारखेडे, गोपाळ नेमाडे, नंदकिशोर महाजन भास्कर सरोदे व परिसरातील अनेक शेतकरी नुकसान स्थळी व पोलिस ठाण्यात उपस्थित राहून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button