Nashik

नाशिक पंचवटीतील फुलेनगर, रामनगर,पेठरोड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या परिसराची मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा पाहणी दौरा

नाशिक पंचवटीतील फुलेनगर, रामनगर,पेठरोड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या परिसराची मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा पाहणी दौरा

नाशिक- प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिकं-: शहर व पंचवटी परिसर कोरोना मुक्त करण्यासाठी आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना महापालिकेच्या वतीने केल्या जात आहेत. पंचवटीतील फुलेनगर, रामनगर,पेठरोड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या ठिकाणी विविध उपाययोजना मनपाच्या वतीने करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पाहणी केली. पंचवटीतील पेठरोड परिसरातील रामनगर ते फुलेनगर बस स्टॉप पर्यंत पाहणी करण्यात आली. यावेळी हा परिसर ठिकाणी बॅरिकॅडींग लावून प्रतिबंधित करावा. जेणेकरून परिसरातील नागरिक येथून बाहेर जाऊ शकणार नाही.अथवा या ठिकाणी कुणीही आत येऊ शकणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरू असून याबाबतच्या नोंदी घेण्याच्या सूचना वैद्यकीय पथकास दिल्या.परिसरात औषध फवारणी करण्यात येत असून त्याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच तपासणी करताना हाय रिस्क, लो रिस्क तसेच ओपीडी मध्ये येणारे रुग्ण याच्या सर्व तपासण्या करून योग्य ते उपचार करण्याच्या सूचना यावेळी मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.परिसरातील राहिवाश्यांना होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करणे,सार्वजनिक शौचालयांमध्ये होमिओपॅथीक औषधे फवारणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आरोग्य विभागास देण्यात आल्या.ठिक-ठिकाणी नागरिकांची जनजागृती करण्याच्या दृष्टीने मनपा पदाधिकाऱ्यांनी मनपास सहकार्य करावे असे आवाहन मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या पदाधिकाऱ्यांना केले. सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था त्वरित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक गुरुमित बग्गा, नगरसेवक जगदीश पाटील,नरेश पाटील,शंकर हिरे,उल्हास धनवटे यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना कुटे, विभागीय अधिकारी विवेक धांडे, उप अभियंता प्रकाश निकम, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे,आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button