Faijpur

प्रा राजेंद्र राजपूत यांना इंग्रजी विषयात पी एच डी पदवी

प्रा राजेंद्र राजपूत यांना इंग्रजी विषयात पी एच डी पदवी

सलीम पिंजारी

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक लेफ्टनंट राजेंद्र रघुनाथ राजपूत यांना इंग्रजी विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीचे नोटिफिकेशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे कुलगुरू प्रा पी पी पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचे संशोधन मार्गदर्शक प्रा डॉ एस पी झनके, भुसावळ कला, विज्ञान आणि पी ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ हे ही उपस्थित होते. प्रा डॉ राजेंद्र रघुनाथ राजपूत यांनी इंडियन इंग्लिश ड्रामाटीस्ट महेश दत्ताणी यांच्या नाटकातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास या विषयावर संशोधन केले. त्यांनी लिंगभेद, हिजड्यांच्या समस्या, एल जी बी टी क्यू यांचे प्रश्न आणि सांप्रदायिक द्वेष अश्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण विवेचन करून प्रबंध लिहला. शांततामय समाज बांधणी साठी या प्रशांची उकल करून सर्व घटकांची स्वीकारहर्याता अती आवश्यक असल्याचे मत प्रा डॉ राजेंद्र राजपूत यांनी मत व्यक्त केले. ते सत्रासेन तालुका चोपडा येथील प्रगतिशील शेतकरी श्री रघुनाथ जुलाल राजपूत यांचे चिरंजीव असून घोडगाव तालुका चोपडा येथील प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत यांचे बंधू आहेत. त्यांनी आपल्या पदवीचे श्रेय संशोधन मार्गदर्शक प्रा डॉ एस पी झनके,आई-वडील, बंधू त्यांच्या पत्नी सौ सोनाली राजपूत, मुलगा रणवीरसिंग राजपूत, मुलगी आराध्या राजपूत तसेच सहकारी प्राध्यापक यांना दिले. तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार रावेर विधानसभा, उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर काशिनाथ चौधरी, श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्राध्यापक किशोर रामदास चौधरी, सचिव प्राध्यापक मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्राध्यापक पी एच राणे, श्री मिलिंद बापू वाघुळदे, कार्यकारणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उदय जगताप, प्राध्यापक डॉक्टर अनिल भंगाळे, प्राध्यापक ए जी सरोदे, प्राध्यापक डी बी तायडे, इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जगदीश पाटील इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button