थट्टामस्करी केल्याने संतापत बापलेकावर तलवारीने वार..तलवारी सह आरोपीस अटक
रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथील तरणाने माझी थट्टामस्करी केली या रागातून एकाने संतापत घरी जाऊन हातात तलवार घेवून येत बापलेकावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु. रावेर सावदा रोडवरील चिनावल रस्त्यावरील फाट्या जवळ घडली आहे. याप्रकरणी एकावर सावदा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सावदा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज उर्फ शांताराम सिताराम आढळे (वय-५४) रा. मोठा वाघोदा बु ता रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ९ एप्रिल रोजी युवराज हे त्यांचा मुलगा ऋषीकेश सह फाट्याजवळील डी.के. महाजन यांच्या घरानजीक गप्पा मारत असतांना त्याठिकाणी दारूच्या नशेत संशयित इमाम मुबारक तडवी हा त्यांचेजवळ आला. आणि यावेळी टिंगल टवाळी केली. त्यानंतर इमाम हा घरी निघून गेला. थोड्यावेळाने इमाम हा हातात तलवार घेवून दोघाजवळ आला. “थांब शांतराम तू लय मातला आहे, तुला आता पाहतोच” असे बोलून त्याच्यावर तलवारने वार केले. यात कपाळावर आणि हातावर दुखापत केली. तर ऋषीकेश याला मारहाण केली. याप्रकरणी शांताराम आढाळे यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार संशयित आरोपी इमाम मुबारक तडवी रा. वाघोदा बु . तालुका रावेर याच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






