Aurangabad

क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय मराठवाड्यावर अन्याय करणारा

क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय मराठवाड्यावर अन्याय करणारा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे होणार असुन त्यासाठी बैठकही घेण्यात आल्याचे छायाचित्र प्रसारीत केलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादमध्ये प्रस्तावित असुन त्याकरिता जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली राज्य शासनाने क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच करण्यात यावे इतरत्र हलविण्यात येवु नये असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असुन त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासित केले होते. मग क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करुन मराठवाड्यावर नेहमी प्रमाणे अन्याय का करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button