Maharashtra

मराठी अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला तिच्या जन्म दिनी सलाम !

मराठी अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला तिच्या जन्म दिनी सलाम !

स्मिता पाटील समांतर चित्रपट सृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी

17 अॉक्टोबर 1955 – 13 डिसेंबर 1986

भारतीय समांतर सिनेमात सशक्त स्त्री व्यक्तीमत्वाच्या भूमिका साकारणारी प्रतिभावान अभिनेत्री अशी जिची ओळख आहे त्या स्मिता पाटीलचा आज जन्मदिन . हिंदी चित्रपटसृष्टी इ.स.1970 व इ.स.1980 च्या दशकात आपल्या प्रगल्भ अभिनयक्षमतेने गाजवणाऱ्या स्मिताचे अल्पायुष्यात वयाच्या अवघ्या 31 व्या निधन झाले नसते , तर केवढे मोठे योगदान तिने हिंदी चित्रपटसृष्टीला दिले असते याची कल्पनाच केलेली बरी.

अतिशय उच्च दर्जाची चित्रपट दूरदर्शन अभिनेत्री . थिएटर चित्रपट दूरदर्शन सर्व माध्यमांवर निर्विवाद प्रभुत्व .स्मिता एक उत्कृष्ट छायाचित्रकारसुद्धा होती . हिंदी आणि मराठी मिळून सुमारे 80 चित्रपटात भूमिका केल्या . त्याही साऱ्या दहा वर्षांच्या अल्प पण देदिप्यमान कारकीर्दीत . जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं चे मूर्तीमंत उदाहरण . तिच्या करियरमधे तिला दोन नँशनल फिल्म ॲवार्ड आणि एक फिल्म फेअर ॲवार्डचा सन्मान मिळाला 1985 मधे तिला पद्मश्रीने गौरवण्यात आले .

दि.17 अॉक्टोबर 1955 रोजी स्मिता पाटीलचा जन्म झाला . प्रसिद्ध राजकारणी शिवाजीराव पाटील आणि विद्या पाटील यांची ती सुकन्या . वडिलांची मंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत दाखल झाले .स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे. १९७२ साली टेलिविजनवर आलेली स्मिता १७-१८ वर्षाची होती. खासगी आयुष्यात स्मिता या खूपच बिनधास्त होत्या. दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कामाला असताना त्या जीन्स आणि टीशर्टमध्ये तिथे जात असत.स्मिताचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले .
१९७७ हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करियरमधील टर्निंग पॉईट ठरले. यावर्षी `भूमिका` आणि `मंथन` हे दोन चित्रपट यशस्वी झाले. दुध सहकारी संघाविरुद्ध बंडाचे नेतृत्व करणाऱ्या हरिजन महिलेची भूमिका श्याम बेनेगल यांच्या “मंथन” (१९७७) चित्रपटातून करत स्मिता प्रकाशझोतात आली. पुढे श्याम बेनेगल यांनी तिला “भूमिका” (१९७७) चित्रपटात मोठी कौशल्यपूर्ण भूमिका प्रदान केली. या कलात्मक चित्रपटांतून त्यांनी नसिरुदीन शाह, शबाना आजमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी सारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटविला. स्मिता यांनी स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्‍यामुळे ‘मिर्च मसाला’मधील सोनबाई, ‘अर्थ’मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली. मराठीतील ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणू काही आपल्‍या मनातली एक भावना आहे, असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटलं. १९७७ मध्ये तिला भूमिका या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता,त्यानंतर ‘जैत रे जैत’ या मराठी चित्रपटासाठी १९७८ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, चक्र या सिनेमातल्या अम्माच्या भूमिकेसाठीही तिने १९८० साली राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता.

?? इ.स.1976 सालच्या तिच्या
‘ मंथन ‘ सिनेमाला इ.स.1977 सालचा उत्कृष्ट चित्रपटाचा
??’ नॕशनल फिल्म ॲवार्ड ‘ पुरस्कार मिळाला .

समांतर चित्रपटाच्या आघाडीच्या नायिकेचे स्थान तिने पटकावले तिच्या कार्यकाळात तिने मसाला सिनेमे सुद्धा केले . तिच्या अभिनय कौशल्याची नोंद घेतल्याशिवाय बॉलिवूडचा इतिहास पुढे जावू शकत नाही . मंथन , भूमिका , आक्रोश चक्र हे तिच्या अभिनय क्षमतेची चुणुक दाखवणारे चित्रपट .

मंथन सिनेमानंतर स्मिताच्या अभिनयक्षमतेची ख्याती हिंदी चित्रपटसृष्टीत पसरली . सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावरील इ.स.1977 च्या बेनेगल यांच्या
‘ भूमिका ‘ चित्रपटाने स्मिताची ओळख एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून प्रस्थापित झाली . या चित्रपटाने स्मिताला उत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘ नॕशनल फिल्म ॲवार्ड ‘ पुरस्कार मिळवून दिला .

स्मिता सुरूवातीला व्यावसायिक चित्रपटाकडे वळण्यास अनुत्सुक होती . पण , या कारणामुळे समांतर सिनेमावालेसुद्धा स्मिताला नाकारायला लागले , त्यामुळे तिला व्यावसायिक सिनेमेसुद्धा स्विकारावे लागले . नमकहलाल आणि शक्ती असे तिचे व्यावसायिक सिनेमेसुद्धा खूप गाजले .

तिच्या आसामान्य टॕलंटची दखल फ्रेंच सिनेमानेसुद्धा घेतली . इ.स.1984 साली ‘ La Rochelle festival ‘ मध्ये तिचा गौरव करण्यात आला . एका तरुण अभिनेत्रीसाठी ही मोठीच पोचपावती होती .

शबाना आझमी बरोबर स्मिताचे ‘ अर्थ ‘ आणि ‘ मंडी ‘ हे चित्रपटही खूप गाजले . तिच्या व्यक्तीगत आयुष्यात तिचे राज बब्बर बरोबरचे प्रेमप्रकरण आणि त्याच्याशी झालेला विवाह हे खूप वादग्रस्त ठरले . दि.13 डिसेंबर 1986 रोजी स्मिताचे बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे दुर्दैवी निधन झाले .

ॲक्टिंग व्यतिरिक्त ती ॲक्टिव्ह स्त्री मुक्ती वादी होती . मुंबईतील वुमेन्स सेंटर ची ती सन्मान्य सभासद होती . स्त्रीयांच्या समस्यांबाबतीत तिची बांधिलकी वाखाणण्याजोगी होती आणि स्त्रीयांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या पारंपारिक भारतीय समाजाच्या गृहिणींच्या भूमिका तिने जाणीवपूर्वक साकारल्या .
१३ डिसेंबर १९८६ रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी, अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला. स्मिता पाटील यांची इच्छा होती, की मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे सजवावा. जेव्हा स्मिता पाटिल यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस बर्फात ठेवण्यात आला होता. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेमध्ये राहत होती. जेव्हा स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली त्यापूर्वी त्यांचे व्यावसायिक मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा विवाहित महिलेप्रमाणे मेकअप केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते.

मराठी अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला तिच्या जन्म दिनी सलाम !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button