Politics on Dr Ambedkar: आंबेडकर.. आंबेडकर.. ही आता फॅशन.. अमित शहा.. राज्यसभेत तुफान राडा…
अमित शाहांच्या विधानावरून तुफान राडा..
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधानाचं योगदान, संविधानाचं महत्त्व या विषयाचं आयोजन केलं. ७५ वर्षांची देशाची गौरवयात्रा, विकासयात्रा यांची चर्चा झाली. लोकसभा आणि राज्यसभेत जेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात तेव्हा प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगळे असतात असं अमित शाह म्हणाले.
बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. शाह यांनी आंबेडकरांच्या नावाचा ‘फॅशन’ म्हणून वारंवार वापर सुरू असल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेतील भाषणादरम्यान अमित शाह यांनी आंबेडकरांच्या नावाचा वापर ‘फॅशन’ म्हणून केला जात असल्याचं म्हटलं आहे. यावर काँग्रेसने शाह यांच्यावर राज्यघटनेच्या निर्मात्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
तर भाजपने यावरून काँग्रेसवरच टीका सुरू केली आहे. काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू असल्याचं यावेळी भाजपने म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी आंबेडकरांचे छायाचित्र संसदेत नेले आणि शाहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. आज (18 डिसेंबर) या संपूर्ण प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत काल केलं नेमकं विधान?
संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान अमित शाह म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही आजकाल फॅशन झाली आहे. ते म्हणाले, ‘आता फॅशन झाली आहे – आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात गेला असता. त्यांचे नाव आणखी शंभर वेळा घ्या, पण मला जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय भावना आहे?’






