Amalner

लासुर हातेड रस्त्यावरील पूल बनला धोकादायक पुलाच्या सल्याबमधील खडी, सिमेंट निघून गेल्यामुळे सळया उघड्या

लासुर हातेड रस्त्यावरील पूल बनला धोकादायकपुलाच्या सल्याबमधील खडी, सिमेंट निघून गेल्यामुळे सळया उघड्यारजनीकांत पाटीललासुर गावाच्या गणपूर फाट्याजवळ पुलाच्या खालच्या सल्याबच्या भागाच्या लोखंडी सळया पूर्णपणे दिसायला लागल्या असून पूल रहदारी साठी आता धोके दायक ठरतो आहे या पुलाच्या संरक्षण भिंतीचे अस्तित्वा कधीच नामशेष झाले आहे हा पूल आपल्या अस्तित्वाचा शेवटचा घटका मोजत आहे भविष्यात या ठिकाणी मोठ्या अपघात होण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहे पूल अतिशय जीर्ण झाला असला तरी बांधकाम विभाग या कडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे
हा पूल फार जुना असून या वर मोठं मोठी अवजड वाहने नेहमी जात येत असतात कारण तालुक्यातील अनेक रस्त्यांचे पुलावर नवीन बांधकाम मंजुरी मिळून नव्याने बांधकाम सुरू आहे मात्र हा पूल आता पूर्णपणे धोकादायक ठरत असल्यामुळे कोणत्याही क्षणी हा पूल कोसळू शकतो या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाकडे जातीने लक्स वेधून भविष्यात होणार अपघात टाळा अशी मागणी परिसरात जोर धरत आहे
हा रस्ता पुढे मध्यप्रदेशात जातो म्हणून या ठिकाणी अवजड वाहने नेहमी जात असतात त्यामुळे पुलावर नेहमी वाहनांची नेहमी वर्दळ सुरू असते त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी जातीने लक्स घालण्याची गरज आहे
भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात झाला तर ही बांधकाम विभागाची जबाबदारी असेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button