Jalgaon

जिल्ह्यात नवविवाहित दाम्पत्यासह लग्नात आलेल्या १६ जणांना कोरोनाची लागण!

जिल्ह्यात नवविवाहित दाम्पत्यासह लग्नात आलेल्या १६ जणांना कोरोनाची लागण!

रजनीकांत पाटील

जळगांव:- एरंडोल तालुक्यात एका गावातील तरुणाचा विवाह नुकताच पार पडला. मात्र, विवाह प्रसंगी कोणत्याही शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले नाही. विवाहास उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. तसेच ठराविक अंतर न ठेवता सर्वजण जवळ जवळ उभे राहिले होते. सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विवाहास उपस्थित असलेल्या तब्बल सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नवविवाहित दाम्पत्यासह हळद लावणारे, विवाहाचे फोटो काढणारे छायाचित्रकार व दोन्ही बाजूकडील नातेवाइकांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत नवविवाहित दाम्पत्य कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, अन्य नातेवाईक देखील उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले आहेत.

दरम्यान विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनातर्फे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जमा करण्यात येत असून त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. विवाह, सार्वजनिक कार्यक्रम, मृत्यू सारखे दुख:द प्रसंग याठिकाणी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनातर्फे वारंवार शासकीय आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करून देखील त्याकडे दुर्लक्ष करणे या परिवारास चांगलेच महागात पडले आहे. तसेच विवाहास उपस्थित असलेल्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रमात तसेच अन्य ठिकाणी उपस्थित राहताना शासकीय आदेशांचे पालन करावे तसेच सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क लावावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button