Maharashtra

प्रदीप पाटील यांनी माझ्या घरातील लेखा जोखा काढावा – निलेश पाटील(बबलू) यांचे विस्तारक प्रदीप पाटील यांना आवाहन

प्रदीप पाटील यांनी माझ्या घरातील लेखा जोखा काढावा – निलेश पाटील(बबलू) यांचे विस्तारक प्रदीप पाटील यांना आवाहन

प्रदीप पाटील यांनी माझ्या घरातील लेखा जोखा काढावा - निलेश पाटील(बबलू) यांचे विस्तारक प्रदीप पाटील यांना आवाहन

 चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल भाजपाचे विधानसभा विस्तारक  प्रदीप पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्यावर केलेले आरोप मी व्यक्ती द्वेषातून केले आहेत .परंतु मी त्यांचा द्वेष करत नाही. मी जे दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले तेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांच्या समोर कार्यकर्त्यांचं सुप्त भावना मांडून दाखवल्या होत्या.प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत जशी कार्यकर्त्यांची गर्दी केली तशी भाजपा शहराध्यक्ष निवड प्रक्रियेत का केली नाही? रवींद्र मराठे यांची नियुक्ती कश्याच्या आधारे केली ? असे आरोप भाजप शक्तिकेंद्र प्रमुख निलेश पाटील यांनी त्यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
    प्रदीप पाटील यांचे म्हणणे आहे की ,मी पदाच्या लालसेपोटी आरोप करत आहे.परंतु मला शहराध्यक्ष पदाची लालसा नाही. तसेच त्यांनी म्हटले आहे की,माझ्या घरात आठ वर्षांपासून काय चालते त्याचा लेखा जोखा प्रदीप पाटील काढणार आहेत. माझे प्रदीप पाटील यांना आव्हान आहे की , त्यांनी माझ्या घरातील लेखा जोखा खुशाल काढावा  आणि लोकांना कळू द्यावे नेमके काय चाललेले आहे.माझ्या घरात माझे आजोबा अनेक वर्षे आमदार होते ,आई नगराध्यक्षा होत्या .या दोघांचा कारभार स्वच्छ व पारदर्शक होता हे जनतेने पाहिलेले आहे .तेव्हा त्यांनी आमच्या घरातील काय गोष्टी आहेत जे प्रदीप पाटील यांना माहीत आहेत, त्या त्यांनी काढाव्यात असे निलेश पाटील यांनी प्रदीप पाटील यांना आवाहन केले आहे . 
        प्रदीप पाटील यांच्याकडे दोन पदे आहेत. तेव्हा त्यांना वेगळा न्याय कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.परंतु मला त्याच्याशी मला  घेणे देणे नाही .शहराध्यक्ष निवडीचा फेरविचार होऊन निवड प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. यासाठी मी व भाजप कार्यकर्ते वरिष्ठांना निवेदन देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी उपशहराध्यक्ष जीवन पाटील,भाजपा किसनसेल अध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button