Maharashtra

कुही पोलिसांच्या नाकाबंदीत मोहफुलाची दारू पकडली   तीन आरोपींना अटक ,एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी अनिल पवार

कुही पोलिसांच्या नाकाबंदीत मोहफुलाची दारू पकडली

तीन आरोपींना अटक ,एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांपा कोरोना’ चे संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी , लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यावर कुही पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे .त्यात नागपूर उमरेड महामार्ग पाचगाव चौकीच्या समोर केलेल्या नाकाबंदीत मोहफुलाच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना कुही पोलिसांनी अटक केली .त्यात तीन मोटर सायकल १५०लिटर मोहफुलाच्या दारूसाठय़ासह एक लक्ष सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

ही कारवाई कुही पोलिस स्टेशन अंतर्गत पाचगाव पोलिस चौकीच्या समोर उपविभागीय पोलिस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्या आदेशानुसार कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के कलम १४४ कायद्यांतर्गत , नागपुर जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी नागपुर उमरेड महामार्गावरील पाचगाव पोलिस चौकी समोर नाकाबंदी केली.

असून , विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करीत असतांना उमरेडहून नागपूरकडे जात असणाऱ्या तीन मोटर सायकलवर कारवाई केली असता आरोपी शंकर नरेश बंजारे वय ३५वर्ष रा.नागपूर , पियुष दिलीप उमरेडकर वय २०वर्ष रा .नागपूर व सूरज राजेश भवरे वय २५वर्ष रा नागपूर , अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

उमरेड ते नागपूरमार्गे पाचगाव पोलिस चौकीच्या समोर नाकाबंदी दरम्यान तीन मोटार सायकल येताना दिसून आल्या सदर कारवाई दरम्यान तीन मोटार सायकल थांबवून तपासणी केली असता तिन्ही मोटार सायकलमध्ये तीन रबरी ट्यूबमध्ये १५०लिटर व सोबतच तीस बॉटल मोहफुलाची गावठी दारू आढळली , एक लक्ष, चाळीस हजार किंमतीच्या तीन मोटर सायकल व १५०लिटर मोहफुलाची गावठी दारूसाठा असा एकूण एक लक्ष सत्तर हजार किंमतीचा माल नाकाबंदी दरम्यान जप्त करण्यात आला .

मोहफुल दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर मुंबई दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे .सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के , पो हवालदार दिलीप लांजेवार , संजय कानडे , पोलिस शिपाई पवन सावरकर , गिरीधर राठोड , अमित पवार यांनी पार पाडली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button